उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) व्दारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ करिता सामायिक प्रवेश परीक्षा (CET)-२०२६-२७ common entrance exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) व्दारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ करिता सामायिक प्रवेश परीक्षा (CET)-२०२६-२७ common entrance exam 

उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी पुणे इ. संस्थांमार्फत केंद्रिय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२७ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे (Offline Mode) आयोजन दि.१९.०७.२०२६ रोजी करण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकः-

ऑनलाईन अर्ज सुरूवात दिनांकः ०१.०६.२०२६ ते १७.०६.२०२६

परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: १९.०६.२०२६ पर्यंत

प्रवेश परीक्षा दिनांक १९.०७.२०२६ (Offline Mode)

टिप-

१. विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरवले जाणार असल्यान मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल.

२. सामायिक प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग

इन करून

त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे.

३. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती SIAC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related posts:

Leave a Comment