शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री व ४ थी व ६ वीसाठी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तसेच मंडळाच्या हीरक महोत्सव २०२६० निमित्त पाठ्येतर पुस्तकांचे राज्यातील शासकीय शाळांना मोफत वितरण करण्याबाबत samagra shiksha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री व ४ थी व ६ वीसाठी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तसेच मंडळाच्या हीरक महोत्सव २०२६० निमित्त पाठ्येतर पुस्तकांचे राज्यातील शासकीय शाळांना मोफत वितरण करण्याबाबत samagra shiksha 

संदर्भः-१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दिनांक १६.०४.२०२५

२) राज्यस्तरीय समन्वय समितीचे दिनांक १३.१०.२०२५ रोचीच्या बैठकीचे इतिवृत्त.

३) नियामक मंडळ ठराव क्रमांक ५५९९ दिनांक ०५.०५.२०२६

४) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांचे पत्र

दि.२६/०५/२०२६

सदर्भ क्रमांक १ अन्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दयावयाची आहेत.

पाठ्यपुस्तक मंडळाच्या दिनांक ०५.०५.२०२६ रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या समेत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७करिता राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांना इयत्ता ३ री व ४ थीसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण तसेच इयत्ता ६ वीसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण, कलाशिक्षण ही अनिवार्य पाठ्यपुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी प्रत्येकी २ संच उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.

तसेच ‘बालभारती हीरक महोत्सव २०२६० वर्षानिमित्त प्रकाशित केलेले (१) बालभारतीच्या कविता (२) स्फूर्तीगीते (३) ५० किशोर गोष्टी भाग-२ (४) डोके नसलेला माणूस (चित्रकथा) व (५) थोरांची ओळख तसेच (६) माझा पहिला इंग्रजी-मराठी शब्दकोश या सहा पाठ्येतर पुस्तकांचा प्रत्येकी १ संच मंडळामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.

जायक्क्रमांकपाशितं/निवेदन /सन२०२८

1/1936640/2026

वरील निर्णयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री. ४ थी व ६ वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांना पाठ्यपुस्तकांच्या प्रत्येकी २ प्रती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. व इतर माध्यमांसाठी सदरची पाठ्यपुस्तके मंडळाच्या ‘ई-बालभारती https://books.ebalbharati.in/ या वेबसाईटवर PDF स्वरूपात प्रकाशित करण्यात येतील. तसेच ‘बालभारती हीरक महोत्सव २०२६० वर्षानिमित्त सहा पाठ्येतर पुस्तकांचा प्रत्येकी १ संच मंडळामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्तबाबत आपल्यास्तरावरून सर्व शाळांना अवगत करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठवण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment