इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ जाहीर प्रकटन eleventh online pravesh prakriya
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९५९४ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत एकूण १२,५१,२५९ विद्याथ्यांनी नोंदणी केली आहे.
पहिल्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्याचा अंतिम दिनांक ०३/०६/२०२६ रोजी पर्यंत ४,५१,०५२ विद्याथ्यांनी त्यांचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित केले आहेत.
दिनांक ०६/०६/२०२६ नियमित दुस-या फेरीतील प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सदर दुस-या नियमित फेरीचे वेळापत्रक सोबत जोडून देण्यात येत आहे.
विद्यार्थी / पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी, या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.









