“सेवा संकल्प अभियान” अंतर्गत राज्यातील PM SHRI शाळांमध्ये चित्रकला आणि वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत pm shri school seva sankalp abhiyan paripatrak
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०२६/प्र.क्र.१३४/एस. डी.-६ ई. १८५२०५६ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : १७, सप्टेंबर, २०२६
संदर्भ :-
संचालक, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, केंद्र शासन यांचे F.N०.१-B/२०२६-SS.१९ दिनांक १४.०९.२०२६ रोजीचे पत्र.
शासन परिपत्रक :-
केंद्र शासनाने सर्व PM SHRI शाळांमध्ये गेल्या २५ वर्षांत देशात राबवलेल्या विविध सेवा आणि विकास उपक्रमांची (“सेवा कार्ये” माहिती आणि “विकसित भारत” च्या दृष्टीकोनाबाबत देशभरात चित्रकला आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर स्पर्धा उपरोक्त निश्चित केलेल्या दोन संकल्पनांवर आयोजित कराव्यात. या स्पर्धांचा उद्देश मुलांना त्यांच्या कल्पना, सर्जनशीलता आणि भारताच्या भविष्यासाठीचा दृष्टीकोन व्यक्त करण्याची संधी देणे हा आहे.
०२. सदर योजनेची अंमलबजावणी पुढीलप्रमाणे करावी :-
1. स्पर्धांचे आयोजनः विहित कालावधीत चित्रकला आणि वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करावा. स्थानिक सोयीनुसार निश्चित केलेले उपक्रम राबवण्यासाठी विहित कालावधीत ७-१० दिवस ठरविण्यात यावेत.
॥. चित्रकला आणि वादविवाद स्पर्धा प्रदर्शनः स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या
उत्कृष्ट चित्रे व वादविवाद स्पर्धेचे शाळेतील योग्य ठिकाणी जसे की उपलब्ध वर्गखोली, हॉल किंवा इतर योग्य जागेत प्रदर्शन आयोजित करावे.
. विद्यार्थ्यांच्या चित्र व वादविवाद स्पर्धाच्या प्रदर्शनाची व्यवस्था करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च केला जाऊ नये.
Iv. समुदाय संपर्कः विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांच्या सर्जनशील कार्याच्या प्रदर्शनाची माहिती कुटुंबांपर्यंत पोहोचवली जावी, जेणेकरून त्यांना विद्यार्थ्यांचा विकसित भारताचा दृष्टीकोन पाहण्यास प्रोत्साहन मिळेल.
v. विद्यार्थ्यांचा सन्मानः संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या व्यवस्थेनुसार उत्कृष्ट चित्रे आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा योग्य सन्मान आणि सत्कार करावा.
८. समुदायाचा सहभागः पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य तसेच गाव/स्थानिक समुदायाला विद्यार्थ्यांची उत्कृष्ट चित्रे व वादविवाद स्पर्धा पाहण्यासाठी आणि या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करावे.
vil. नोडल शिक्षकः स्पर्धेशी संबंधित उपक्रमांचे समन्वय साधण्यासाठी आणि योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शाळा स्तरावर एका नोडल शिक्षकाची नियुक्ती करावी.
VIII. दस्तऐवजीकरण आणि शिक्षणाधिकारी कडे सादरीकरणः शाळेने शाळास्तरीय प्रदर्शनाची एक रील/व्हिडिओ तयार करावी आणि विहित केल्यानुसार संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवावी.
Ix. जिल्हास्तरीय प्रदर्शनः शिक्षणाधिकारी यांनी शाळांकडून प्राप्त झालेल्या निवडक प्रवेशिकांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन आयोजित करावे.
x. राज्यस्तरीय प्रदर्शनः जिल्हास्तरीय प्रदर्शनातून निवडलेल्या प्रवेशिकांचा विचार संबंधित अधिकाऱ्यांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी केला जाईल.
xl. प्रदर्शनांमध्ये सहभागः जिल्हा आणि राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये स्थानिक लोकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करावेत.
०३. या उपक्रमाचा उपयोग मुलांना विकसित भारताच्या त्यांच्या स्वप्नांना आणि कल्पनेला आकार देण्यासाठी तसेच ते व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची संधी म्हणून केला जाऊ शकतो, ज्यामुळे या अभियानाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे पालक आणि स्थानिक समुदायात अधिक जागरूकता निर्माण होईल.
०४. सर्व PM SHRI शाळांनी वरील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि उपक्रमाचे यशस्वी आयोजन करावे.
०५. सदर उपक्रम सर्व PM SHRI शाळांपर्यंत पोहोचवावा आणि शाळास्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी. तसेच स्पर्धाचे वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे, संकल्पना आणि इतर आवश्यक माहितीसह सर्व संबंधित शाळांना पुरेशा वेळेआधी कळवावी.
०६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२६०९१७१५२६२३७८४९ असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










