“आंतरराष्ट्रीय योग दिन” आयोजनाबाबत yoga day celebration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“आंतरराष्ट्रीय योग दिन” आयोजनाबाबत yoga day celebration

संदर्भ :

– १. मा. अतिरिक्त सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, नवी

दिल्ली यांचे पत्र D.O.N०. १३-२/२०२६-९९.४ दि. २९.०५.२०२६

२. मा. सहसचिव, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र DO No: W-

१२०१७/२/२०२६- IEC दि. १८.०५.२०२६

उपरोक्त विषय व संदर्भानुसार आयुष मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेमार्फत दिनांक २१ जून, २०२६ रोजी होणाऱ्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (IDY) देशव्यापी आयोजनाचे समन्वय करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, योगाला दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून अंगीकारण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रचार करण्यासाठी, आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ शी संबंधित प्राथमिक क्रिएटिव्ह्ज (logos, बॅकड्रॉप्स संदर्भ साहित्य, आणि व्हिडिओ, बॅनर्स व इन्फोग्राफिक्स यांसारखे सोशल मीडिया साहित्य) असलेली एक गूगल ड्राईव्ह लिंक तयार करून शेअर केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी हे साहित्य आपल्या अधिनस्त सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावे. हे साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे:

आंतरराष्ट्रीय योग दिन या उपक्रमात जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी यांनी सहभागी होणेबाबत सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना) यांनी आपले अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांचे मुख्याध्यापक यांना आपले स्तरावरून सूचित करावे. तसेच सोबत दिलेल्या लिंकमध्ये माहिती प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य/योजना) यांनी समन्वयाने भरावी.

सोबत लिंक –

https://docs.google.com/spreadsheets/d/1L TLYPNJRoZ95eKW1vRLkYbvetkz3Uyox

WiWPVjWgwl/edit?usp=sharing

Leave a Comment