महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट (MAHATET) २०२६ mahatet exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट (MAHATET) २०२६ mahatet exam

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट (MAHATET) २०२६

१०. दिव्यांग उमेदवारः लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत

मार्गदर्शक सूचना

(१) फक्त दृष्टिहिन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित व किमान ४०% कायमस्वरूपी विकलांगत्व असलेल्या पात्र उमेदवारांना, ते लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास, परीक्षा प्रयोजनार्थ गुणवत्तेनुसार लेखनिकांची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी (Compensatory time) अनुज्ञेय राहील.

(२) प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या पात्र विकलांग उमेदवारांना, लेखनिकाची मदत आणि/अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवाराने संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.)/शिक्षण निरीक्षक मुंबई (द/उ/प.) यांचेकडे अर्ज (प्रपत्र-१) करुन पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

(३) अर्जामध्ये मागणी केली नसल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याची विहित पद्धतीने पूर्व परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय असणार नाही.

(४) किमान ४०% विकालांगत्त्व असलेल्या, तसेच लिहिण्यासाठी कायमस्वरुपी वेगावर मर्यादा असल्याबाबत (Physical Limitation to write including that of speed) शासन पत्र, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रवि २०१७/प्र.क्र. १९६/आरोग्य-६, दि १३/१०/२०१७, अन्वये विहित करण्यात आलेले सोबतच्या नमुन्यातील प्रमाणपत्र (प्रपत्र-२) सादर करणाऱ्या उमेदवारांनाच लेखनिकाची सेवा अथवा अनुग्रह कालावधी देण्याबाबत विचार करण्यात येईल.

(५) अ) उमेदवाराने स्वतः लेखनिकाची व्यवस्था करावी व त्याच्या मानधनाची व्यवस्था उमेदवारास करावी लागेल.

ब) लेखनिकासाठी महत्त्वाची सूचना लेखनिकाचे शिक्षण इयत्ता १२वीच्या आतील असावे व वय दि. २८/०६/२०२६ रोजी १९ वर्षपिक्षा जास्त नसावे.

क) कुटुंबातील व्यक्तीस (स्वतःचा मुलगा, मुलगी) लेखनिक म्हणून सेवा देता येणार नाही.

(६) परीक्षेच्या वेळी उमेदवार तसेच लेखानिक यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र-३) लेखनिकाच्या फोटोसह संयुक्त हमीपत्र /घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

(७) विहित नमुन्यात संपूर्ण भरलेले हमीपत्र/घोषणापत्र उमेदवाराने शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (द/प/उ) यांचेकडून प्रतिस्वाक्षरीत करुन परीक्षा सुरु होण्याच्या पूर्वी समवेक्षक / केंद्रसंचालकांस तपासणीसाठी सादर करणे अनिवार्य राहील त्याशिवाय लेखनिकाची व्यवस्था अनुज्ञेय ठरणार नाही.

(८) उमेदवाराने स्वतः व्यवस्था केलेल्या लेखनिकाच्या गैरवर्तनाची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल. लेखनिक व उमेदवार यांच्यामधील संभाषणामुळे परीक्षेची शांतता कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही अथवा इतर उमेदवारांची एकाग्रता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

(९) परीक्षा परिषदेकडून अथवा पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्यास उमेदवार व लेखनिकावरील इतर कायदेशीर कारवाईसह संबंधीत उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

(१०) लेखनिकाने स्वतः प्रश्नपत्रिका सोडवू नये अथवा उमेदवारास कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन वा सूचना करु नयेत. उमेदवाराकडून तोंडी सूचविण्यात येणारे उत्तर लेखनिकाने नमुद करणे एवढेच आवश्यक राहील.

(११) अनुग्रह कालावधी

(अ) फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवार यांनाच अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील.

(ब) सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र (प्रपत्र-२) परीक्षेचे वेळी सादर करणाऱ्या उमेदवारांनाच अनुग्रह कालावधीची परवानगी देण्यात येईल.

(क) प्रत्येक तासाला २० मिनिटे याप्रमाणे अतिरीक्त वेळ देण्यात येईल.

(ड) अनुग्रह कालावधीची मागणी करणाऱ्या उमेदवाराने विहित नमुन्यात (प्रपत्र-४) प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे तसेच परीक्षा सुरु होण्याच्यापूर्वी समवेक्षक/केंद्रसंचालक यांचेकडे देणे अनिवार्य राहील.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment