क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ करीता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत krantijoti savitribai fule shikshak puraskar
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४ दि.१६/०७/२०२५.
२. शासन पत्र क्र. पीटीसी-२०२६/प्र.क्र.४६/टीएनटी-४ दि.२६/०५/२०२६.
उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की, शासनाने संदर्भीय शासन पत्र क्रमांक २ अन्वये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पुरस्कार प्रक्रिया राबविणेबाबत संचालनालयास सूचित करण्यात आलेले आहे.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
संदर्भीय क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://forms.gle/EgZ२६६AqNDxFJDZW८ या लिंकवर आपली आवेदने दिनांक २७ जून, २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पासून दिनांक १० जुलै, २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.
सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.










