राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढणेबाबत ayushyaman bharat card 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढणेबाबत ayushyaman bharat card 

संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक वैखप्र-१६२५/ (१४९/२५)/टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/टि-७/आयुष्यमान /६१५७ दिनांक ०५/०३/२०२६.

३. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र शिसंमा/२०२६/टि-७/आभा/६८९३ दिनांक २२/०५/२०२६.

उपरोक्त संदर्भीय पत्र क्र ३ अन्वये राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत असलेले आरोग्य संरक्षणाचे अनुज्ञेय लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढण्याबाबत कळविण्यात आलेले होते.

सदरील पत्रातील परिच्छेद क्र ३ मध्ये नमूद “यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैदयकीय प्रतिपूर्तीचे देयक स्विकारले जाणार नाही” ही ओळ रदद करण्यात येत आहे.

करिता, विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्यामुळे आपले कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढण्याबाबत अवगत करण्यात यावे.

आहे. त्याअनुषंगाने हे कार्ड काढण्याची कार्यपध्दती तसेच व्हिडीयो लिंक या पत्रासोबत पुनःश्च जोडण्यात येत

Related posts:

Leave a Comment