सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) set exam
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित
सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली एकेचाळीसावी (४१ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. २६ जुलै, २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) या शहरातील केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केवळ ऑनलाईन पदधतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. संकेतस्थळावर नियमित शुल्कात परीक्षा अर्ज दि. २ जून, २०२६ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. १६ जून, २०२६ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. विलंब शुल्कासहीत परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी दि.१७ जून, २०२६ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. १९ जून, २०२६ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.
विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पदधतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे पाठवू नये.
संवर्गनिहाय परीक्षा शुल्क (प्रक्रिया शुल्कासह)
(टीप:- *उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मयदिसंबंधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पहावा तसेच यासंदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असतील.)
विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी केडीट/डेबीट कार्ड, युपीआय किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट/डेबीट कार्ड / युपीआय/इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.
सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या “https://setexam.unipune.ac.in” या संकेतस्थळावर साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात प्रसिदध करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुदधा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा.
सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. “https://setexam.unipune.ac.in” या
टीप : जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.










![Release of Admit Cards for the Candidates of National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)]-2026...](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/04/Screenshot_2026_0426_220205-150x150.jpg)