महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश karmachari badli adhyadesh

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश karmachari badli adhyadesh 

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ मे २०२६.

MAHARASHTRA ORDINANCE No. V OF 2026,

AN ORDINANCE FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA GOVERNMENT SERV-ANTS REGULATION OF TRANSFERS AND PREVENTION OF DELAY IN DISCHARGE OF OFFICIAL DUTIES ACT, 2005.

सन २०२६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही;

२००६ चा महा.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे २१- विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे;

भाग चार-२८-१

(१)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे २७, २०२६/ ज्येष्ठ ६, शके १९४८

त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :-

संक्षिप्त नाव व

१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय प्रारंभ. कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अध्यादेश, २०२६, असे म्हणावे.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

सन २००६ चा

२. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना २००६ चा महाराष्ट्र होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ याच्या कलम ४ मध्ये,-महा. २१.

अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम ४ ची सुधारणा.

(क) पोट-कलम (४) मधील,-

(एक) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईलः-

“परंतु, जनगणना, २०२७ शी संबंधित काम सुरू असल्यामुळे, सन २०२६ मध्ये करण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दिनांक ३० जून २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी करण्यात येतीलः”;

(दोन) विद्यमान परंतुकातील, “परंतु” या मजकुराऐवजी, “परंतु आणखी असे की” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(ख) पोट-कलम (४क) वगळण्यात येईल.

Related posts:

Leave a Comment