उच्च प्राथमिक (इ. ५वी) व माध्यमिक (इ. ८ वी) तील प्रलंबित पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ वितरीत होण्यासाठी आधार संलग्न बँक खात्याचा तपशील त्वरीत ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत scolarship rakkam online paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उच्च प्राथमिक (इ. ५वी) व माध्यमिक (इ. ८ वी) तील प्रलंबित पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ वितरीत होण्यासाठी आधार संलग्न बँक खात्याचा तपशील त्वरीत ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत scolarship rakkam online paripatrak 

संदर्भ : मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या दि.२४.६.२०२६ च्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सूचना.

उपरोक्त विषयाबाबत दि.२४.६.२०२६ रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे इ.५वी इ.८वी च्या बँक खाते माहिती प्रलंबित असल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांक चूकीचा असल्यामुळे त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची पाठविण्यात आलेली रक्कम जमा झालेली नाही. तरी अशा सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती दि.५.७.२०२६ पर्यंत भरुन घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करणेबाबतचे निर्देश मा. आयुक्त (शिक्षण) यांनी दिलेले आहे. सन २०२२ ते २०२५ मधील इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी तील ज्या विद्यार्थ्यांची बँक डिटेल्स भरणे प्रलंबित राहिले आहे. अशा विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय व तालुका निहाय यादी आपल्या जिल्हयाच्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच या पत्रासोबत आपल्या जिल्हयातील प्रलंबित शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या जिल्हयातील प्रलंबित शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी त्रुटींसह प्राप्त करता येईल. संकेतस्थळाचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय लॉगीन आयडी व पासवर्ड या पत्रासोबत दिलेला असून आपलेस्तरावर अधिनस्त तालुक्यांचा पासवर्ड रिसेट करुन देण्यात यावा.

सन २०२२ ते २०२५ मधील आपल्या जिल्हयातील इ.५वी व इ.८ वी तील पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. तथापि, काही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाशी संलग्न बैंक खाते तपशील अद्याप प्राप्त झालेले नाहीत अथवा अचूक नसल्याने शिष्यवृत्ती वितरणची कार्यवाही प्रलंबित आहे.

आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित शाळा/संस्थाकडून प्रलंबित पात्र विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बैंक खाते तपशील तात्काळ संकलित करुन या कार्यालयास आपणांस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संकेतस्थळावरील लॉगीन वर उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच प्राप्त माहितीची अचूकता पडताळून ती विहित मुदतीत सादर करण्याबाबत दक्षता घ्यावी.

सदर बाब गांभीर्याने घेऊन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी आपल्या स्तरावर वैयक्तिक लक्ष देऊन कार्यवाही करण्यात यावी. या कामास सर्वोच्च प्राधान्य देऊन अनुपालन अहवाल तात्काळ दि.५.७.२०२६ पर्यंत सादर करावा.

सोबत – विद्यार्थ्यांची यादी

Related posts:

Leave a Comment