नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT) पायाभूत चाचणी करिता UDISE + वरील विद्यार्थी वर्गोन्नती (प्रमोशन) बाबत udise plus 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT) पायाभूत चाचणी करिता UDISE + वरील विद्यार्थी वर्गोन्नती (प्रमोशन) बाबत udise plus

संदर्भ : १) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई (MPSP) यांच्याकडून UDISE + वरील प्राप्त विद्यार्थी संख्या दिनांक २७.०५.२०२६

मा. महोदय,

वरील विषयानुसार राज्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दरवर्षी परिषदे मार्फत एकूण तीन नियतकालिक मुल्यांकन चाचण्या नियोजित आहेत. चाचण्यासाठी UDISE + वरील विद्यार्थी संख्येचा वापर करून राज्यातील सर्व तालुक्यांना चाचणी पत्रिका वितरीत केल्या जातात. या वर्षी पायाभूत चाचणी (PAT-१) करिता विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी संदर्भ क्र. १ नुसार विद्यार्थी संख्या प्राप्त झाली आहे. परंतु सदर संख्या ही मागील वर्षातील विद्यार्थी संख्या असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून UDISE + वर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ वरून २०२६-२०२७ साठी प्रमोशन होणे गरजेचे आहे. जेणे करून प्रत्यक्ष ज्या त्या वर्गाची संख्या त्या त्या वर्गासाठी वापरता येईल व राज्यातील सर्व शाळांना पायाभूत चाचणी पत्रिका वितरीत करताना कमी पडणार नाहीत. या संदर्भात संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना स्वतंत्र पत्राद्वारे सूचित करण्यात येत आहे. कृपया UDISE + वरील अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यास विनंती आहे.

with

Related posts:

Leave a Comment