विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शिक्षकांच्या नियुक्ती व शाळांच्या वेळेबाबत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शिक्षकांच्या नियुक्ती व शाळांच्या वेळेबाबत

संदर्भ :- मा. उपसचिव तथा सह मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. ईएलआर-२०२६/प्र.क्र.७०/निवडणूक-६, दि.०३/०७/२०२६

विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत राज्य शासकीय / स्थानिक प्राधिकारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण सुमारे २४ वर्षानंतर राबविण्यात येत आहे. सदर काम राष्ट्रीय कर्तव्य असुन भारत निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सबब, शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज पार पाडण्याकरीता त्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच सदर काम विहित कालावधीत पूर्ण व्हावे आणि त्यांच्यावर कामाचा ताणही येवू नये, याकरीता सर्व शाळा प्रशासनांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत.

अ) त्यानुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त शिक्षकांच्या अध्यापनाचे नियोजन करताना त्यांच्या शिकवणीच्या तासिका

शक्यतो कमीत कमी ठेवाव्यात व त्या प्राधान्याने सलग ठेवून शक्यतो शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरविण्याचे नियोजन दि.३० जुलै, २०२६ पर्यंत करण्यात यावे. जेणेकरुन संबंधित शिक्षकांना त्यांचे शैक्षणिक कार्य सलगपूर्ण करुन उर्वरित वेळेत (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेली जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडता येईल.

ब)

ज्या शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही, अशा शिक्षकांनी आवश्यकतेनुसार BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना शैक्षणिक व संबंधित कामकाजामध्ये सहकार्य करावे, तसेच शाळा प्रमुखांनी अशा प्रकारे अंतर्गत कामाचे नियोजन करावे की BLO म्हणून नियुक्त शिक्षकांवर अतिरीक्त कामाचा ताण पडणार नाही.

वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अनुपालन अहवाल विहित नमुन्यात व विहित कालावधीत शिक्षण संचालनालयास सादर करण्यात यावा. सदर सूचना तात्काळ अंमलात आणण्यात याव्यात.

Related posts:

Leave a Comment