भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना एकवेळचे (One time) मानधन अदा करणे sir mandhan paripatrak
वाचा:-
BLO Special All…
भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना एकवेळचे (One time) मानधन अदा करणे.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक:- ईएलआर-२०२६/प्र.क्र.८५/नि-६
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २८ जुलै, २०२६
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रःईएलआर-२०१९/प्र.क्र.९१८/१९/३३, दिनांक २६ सप्टेंबर, २०१९
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, ईएलआर-२०२५/प्र.क्र.७०/२५/नि-६, दिनांक ०१ सप्टेंबर, २०२५
३) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/बीएलओ /२०२६-ईआरएस, दिनांक १४ जुलै, २०२६.
प्रस्तावना:-
भारत निवडणूक आयोगाने दिनांक १४ मे, २०२६ रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह १६ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे.
२. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना घरोघरी जाऊन सर्व मतदारांशी संपर्क साधून मतदार याद्यांचे सखोल पुनरिक्षण करावयाचे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना पत्रक (Enumeration form) वाटप करणे, मतदारांनी गणना पत्रक (Enumeration form) भरल्यावर मतदारांकडून फॉर्म गोळा करणे, फॉर्मचे डिजिटायझेशन करणे इ. कामे करीत आहेत. तसेच, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमादरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून बिनचूक व विहीत कालावधीत काम करुन घेण्याकरीता, त्यांच्यावर देखरेख करण्याकरीता, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) नियुक्त करण्यात आले आहेत. सदर कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) हे त्यांची मूळ कार्यालयीन कामे सांभाळून करीत आहेत.
३. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक १४.०७.२०२६ च्या पत्रान्वये, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना प्रत्येकी रु.६,०००/- इतके एकवेळचे (One time) मानधन मंजूर केले आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना मानधन देण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय स्तरावर कराव्या लागणाऱ्या कामाकरीता प्रत्येकी रु.६,०००/- इतके एकवेळचे (One time) मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर मानधन त्यांना देण्यात येणाऱ्या नियमित मानधनाच्या व्यतिरिक्त राहील.
४. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च मागणी क्र. ए-२, लेखाशिर्ष “२०१५-निवडणूका, १०३-मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (००) (०१) मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (२०१५००३२)”, “१३ कार्यालयीन खर्च”, या उद्दिष्टाखाली सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
५. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. अनौप ४३८/व्यय-४, दिनांक १७.०४.२०२६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२६०७२८१७४२०६२७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,










