शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत pavitra portal shikshak bharti
उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत
१. जिल्हा परिषद, कोल्हापूर (इयत्ता १ ली ते ८ वी), जिल्हा परिषद, सांगली (इयत्ता ६ वी ते ८ वी) व जिल्हा परिषद, रत्नागिरी (इयत्ता ६ वी ते ८ वी) या व्यवस्थापनाच्या जाहिरातीतील पदांमध्ये संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी बदल करण्याबाबत कळविल्याने जाहिरातीत बदल झाला आहे. यास्तव आज दिनांक ०७/०८/२०२६ रोजी रात्री ११:०० पर्यंत जनरेट केलेल्या प्राधान्यक्रमामध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे अशा उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करण्याची दक्षता घ्यावी.
२. मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक ७२७८/२०२४ मधील सिव्हिल अप्लिकेशन न. ७८२७/२०२६ मधील दिनांक ३१/०७/२०२६ रोजीच्या आदेशानुसार श्री तिरुपती शिक्षण प्रसारक मंडळ जालना जिल्हा जालना (२७१८०१८८०६३) या संस्थेतील जाहिरातीतील नियुक्तीची कार्यवाही याचिकेतील निर्णयाच्या अधीन करण्याबाबत मा. न्यायालयाचे आदेश आहेत, याबाबी सदर संस्थेचे प्राधान्यक्रम नोंद (Lock) करणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.










