शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत pavitra portal shikshak padbharti
संदर्भ
:- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक सीईटी-२०१५/ प्रक्र १४९/टीएनटी-१ दिनांक ०७/०२/२०१९.
२. शासन निर्णय क्रमांक क्र. संकिर्ण-२०१८/प्रक्र३११/टीएनटी-१ दिनांक १/०१/२०१९.
३. शासन निर्णय क्र संकिर्ण-२०२२/प्रक्र १०६/टीएनटी-१ दिनांक १०/११/२०२२
४. शासन निर्णय क्र संकिर्ण-२०२३/प्रक्र१७४/टीएनटी-१ दि.२१/०६/२०२३
५. शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०१८/प्रक्र ३९७/टीएनटी-१ दि.०७/०२/२०१९,
शुद्धिपत्रक दिनांक २५/०२/२०१९,दि.१६/०५/२०१९ व दि.१२/०६/२०१९
६. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२३/प्रक्र ५०९/ टीएनटी-१ दि.१३/१०/२०२३
७. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक ०१/०१/२०२६, दि.२०/०१/२०२६,
दि.३०/०३/२०२६, दि.०२/०४/२०२६ व दिनांक २४/०७/२०२६ ८. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०९/०६/२०२६
९. पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी/व्यवस्थापनांसाठी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या सूचना
१०. समक्रमांकाचे पत्र दिनांक २८/०८/२०२६
११. शासन पत्र क्र संकीर्ण-२०२६/प्रक्र ९३/ई-१८२७९०६/टिएनटी-१ दि.२१/०९/२०२६
उपरोक्त शासन निर्णय व सूचना कृपया पाहाव्यात.
१. उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी दिनांक २७/०८/२०२६ रोजी नियमित फेरीतील गुणवत्ता प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी या व अन्य समांतर आरक्षणातील रिक्त पदे विचारात घेवून रुपांतरित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर उमेदवारांची तात्पुरती शिफारस पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आलेली आहे. नियुक्तीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्व-
प्रमाणपत्रात नोंद केलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या/प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्यात यावी व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात यावी.
२. यापूर्वी दिनांक २७/०८/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणी व त्यानंतर नियुक्ती देण्यासाठी या कार्यालयाचे संदर्भाधिन पत्र दिनांक २८/०८/२०२६ अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार या रूपांतरीत फेरीत निवड झालेल्या उमेदवारांबाबत देखील कार्यपद्धतीचा अवलंब करून पुढील कार्यवारी करण्यात यावी.
३. शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची कार्यवाही दिनांक २४/०९/२०२६ ते २८/०९/२०२६ या कालावधीत तर पात्र असलेल्या उमेदवारांना पदस्थापनेबाबत समुपदेशनाची कार्यवाही दिनांक ०५/१०/२०२६ ते ०९/१०/२०२६ या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात यावे. तथापि, उमेदवारांची संख्या कमी असल्यास दिलेल्या वेळापत्रकापुर्वी देखील नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करता येईल याचीही नोंद घेण्यात यावी.
वरीलप्रमाणे तसेच संदर्भाधिन पत्र दिनांक २८/०८/२०२६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील मुद्दा क्रमांक ७ मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.










