असाक्षर मुक्त गावाची शपथ घेणे व नवसाक्षरांना प्रमाणपत्र वाटप करणेबाबत asakshar mukta gav shapatha
संदर्भ :
1) शासन निर्णय क्रमांक: नभासाका-0322/प्र.क्र.39/ एस.डी.2, मंत्रालय, मुंबई -32 दि. 14 ऑक्टोबर, 2022.
2) शासन निर्णय क्रमांकः नभासाका-1626/प्र.क्र. 84/ एस.डी. 2, मंत्रालय, मुंबई 32. दि. 2 जून, 2026.
उपरोक्त संदर्भ क्र. 1 नुसार, केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क्र. 2 नुसार, सन 2022 ते 2027 पर्यंत चालणाऱ्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / गटस्तरीय / शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत ‘असाक्षर मुक्त गावाची शपथ घेतल्यास 100% साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच या दिवशी दि. 29 मार्च, 2026 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन परीक्षेस उत्तीर्ण नवसाक्षरांना मा. पालक मंत्री, मा. लोक प्रतिनिधी, मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. तहसीलदार, मा. गट विकास अधिकारी, आजी-माजी स्वातंत्र्य सैनिक या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत.
तरी सदर ‘असाक्षर मुक्त गावाची शपथ’ प्रत्येक विद्याथ्यनि घेण्याबाबत व नवसाक्षरांना प्रमाणपत्र वाटप करणेबाबत आपण आपल्या अधिनस्त यंत्रणेस आदेशित करावे. सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मेडिया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात सोफत प्रसिद्धी देण्यात यावी.
सोबत : ‘असाक्षर मुक्त गावाची शपथ’
साक्षरता शपथ
मी……..अशी शपथ घेतो / घेते की, माझे संपूर्ण कुटूंब, गाव, दिनांक 01 मे 2027 पर्यंत साक्षर करेल, मी माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेन.
मी, माझ्या कुटूंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी मदत करणार आहे. मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करणेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन.
सर्व असाक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी १०० टक्के योगदान देवून माझा महाराष्ट्र, साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मी कटीबद्ध आहे, अशी शपथ घेत आहे.
जय हिंद !
जय महाराष्ट्र !!
जय उल्लास !!!










