राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ स्पर्धेसाठी नियम, अटी, गट, उद्दिष्टे, अहवाल लेखन मुद्दे, नियोजन, कार्यपद्धती, माहितीपत्रक state level navopkram spardha paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ स्पर्धेसाठी नियम, अटी, गट, उद्दिष्टे, अहवाल लेखन मुद्दे, नियोजन, कार्यपद्धती, माहितीपत्रक state level navopkram spardha paripatrak 

माहितीपत्रक

राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास, कृतीशील शिक्षण, कौशल्याधिष्टीत शिक्षण, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग, शाळा व समाज यांच्यातील सशक्त नाते विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

यानुषंगाने शाळा व कार्यक्षेत्रांत राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांनी या स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन शाळेत व कार्यक्षेत्रात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करावे. या राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे.

शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापक, विषय साधनव्यक्ती, विषयसहायक, केंद्रप्रमुख व अधिकारी यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

स्पर्धेसाठी गट :

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्ती / सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट – पायाभूत स्तर (प्राथमिक शिक्षक इ.१ ली व २ री)

३. प्राथमिक गट – पूर्वतयारी स्तर (प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक ३.३ ते ५)

४. प्राथमिक गट – पूर्व माध्यमिक स्तर (प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापक इ.६ ते ८)

५. माध्यमिक गट – माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक (इयत्ता ९ वी ते १२ वी)

६. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व शिक्षकेतर कर्मचारी

७. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी तसेच अधिव्याख्याता, वरिष्ठ

अधिव्याख्याता व प्राचार्य)

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :

१. पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी, शैक्षणिक समस्या

सोडवण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.

२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.

३. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे,

४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.

५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.

नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे :

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

१) नवोपक्रमाचे शीर्षक उपक्रमाचे शीर्षक नेमकेपणाने लिहावे.

२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व हा उपक्रम मी का करतो आहे? उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे – या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४) नवोपक्रमाचे नियोजन –

१) उपक्रम पूर्वस्थितीचे निरीक्षण

२) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा

३) आवश्यक साधनांचा विचार

५) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण

४) करावयाच्या कृतींचा क्रम

७) उपक्रमासाठी इतरांची मदत

६) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)

८) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे

५) नवोक्रमाची कार्यपद्धती –

1. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

11. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन

III. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

IV. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी

v. माहितीचे विश्लेषण: आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)

या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी

यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी. ७) समारोप आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे स्पष्ट करावे,

८) संदर्भसूची व परिशिष्टे नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते

परिशिष्टामध्ये जोडावे.

स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८ वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.

२. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती / सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / DIETमध्ये विषय सहाय्यक / DIETअंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

५. सन २०२४-२५ पासून मराठी माध्यमासह इतर माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी देखील सदर स्पर्धेत भाग घेऊ शकतील. मात्र इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करावा.

स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३. नवोपक्रम स्पर्धकाने स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत स्पर्धकाने नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन अहवाल व लघुसंशोधन अहवाल पाठवू नयेत.

५. नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत टंकलिखित केलेला असावा.

६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू वरील बाजू तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास असावा.

७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२५-२६ किंवा २०२६-२७ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा,

९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी, फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

१०. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.

११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अपलोड करावेत.

१२. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे प्रत्यक्ष (ऑफलाईन) सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.

नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन :

नवोपक्रम स्पर्धेचे मूल्यांकन प्रत्येक स्तरावर दोन फेरीमध्ये केले जाणार आहे. जिल्हा व विभाग स्तरावर द्वितीय फेरी ही पहिल्या फेरीत गुणानुक्रमे पहिल्या १ ते ७ क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणानुक्रमे पहिल्या १ ते १० क्रमांकासाठी राबविण्यात येईल.

जिल्हास्तर व प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तरावर प्रथम फेरीत नवोपक्रम अहवालांचे मूल्यांकन करून प्रथम १ ते ७क्रमांकावर असलेल्या नवोपक्रमांचे सादरीकरण कार्यालयात करून द्वितीय फेरीत मूल्यांकन करण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारावरच जिल्हा व विभाग प्रथम पाच क्रमांक निर्धारित करण्यात येऊन तेच पुढे राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. (टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे सात ही गटाचे मूल्यमापन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)

नवोपक्रम अहवालाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून राहील.

राज्यस्तरावर वरीलप्रमाणेच नवोपक्रम अहवालावरून प्रथम फेरीतील गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील १० उत्कृष्ट नवोपक्रम काढण्यात येतील. त्या स्पर्धकांना नवोपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारे पाच गुणानुक्रम व पुढील पाच उत्तेजनार्थ क्रमांक निश्चित करण्यात येतील.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही :

पहिला टप्पा :

अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

आ) विभागस्तरावरील पुरस्कार विषय सहायक व विषय साधन व्यक्ती तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे नवोपक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५ % पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले

जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

(टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल)

दूसरा टप्पा :

राज्यस्तरावरील पुरस्कार नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित पुढील सात गटातील पारितोषिकांचे वितरण केले जाईल.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment