संकलित २ (PAT ३) च्या विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबत pat exam live report paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संकलित २ (PAT ३) च्या विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबत pat exam live report paripatrak 

संदर्भ: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० (NEP-२०२०)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र या कार्यालयामार्फत दरवर्षी तीन वेळा नियतकालिक चाचण्या (Periodic Assessment Test – PAT) घेण्यात येतात. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना संकलित चाचणी २ (PAT-३) चा विद्यार्थ्यांचा वर्ग व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) SwiftChat App वर पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या Live Report च्या आधारे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील त्रुटी व बलस्थाने ओळखता येतील. अध्ययन निष्पत्तीनिहाय इ. २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या उपचारात्मक अध्यापनासाठी व पुढील अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करण्यास मदत होईल. शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती या पर्यवेक्षकीय यंत्रणेने वर्ग भेटीदरम्यान सदरील अहवालानुसार विद्यार्थ्यांची संपादणूक पडताळणी करावी.

SwiftChat App मध्ये सदरील Live report पाहणे अथवा Download करण्यासाठी Bot Link / QR Code व User Manual सोबत देण्यात येत आहेत. सदरील बाब सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी.

User Manual – https://tinyurl.com/LiveReportUsermanua

Bot Link: https://links.swiftchat.ai/klGsN9

Related posts:

Leave a Comment