महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत mahsul sevak padabharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत mahsul sevak padabharti 

संदर्भ :- (१) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. केओटी-२०१२/प्र.क्र.१७/ई-१०,

दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३.

(२) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७/ई-१०,

दिनांक १७ मे, २०२३.

महोदय,

उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील दि.३१.०५.२०२६ रोजी रिक्त असलेल्या २९१२ इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी “एक विशेष बाब” म्हणून शासनाने मान्यता दिली आहे.

२. त्यानुषंगाने कळविण्यात येते की, उक्त संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील उक्त २९१२ पदांची भरतीप्रक्रिया त्वरीत करण्यात यावी. (सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार) तसेच वरीलप्रमाणे कोतवालांची पदे भरतांना संदर्भाधीन क्रमांक (२) येथील शासन निर्णयातील सुधारित तरतूदींचे काटेकोरपणे पालन करुन त्याप्रमाणेच कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पदभरती प्रक्रिया दि.३०.११.२०२६ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment