शिक्षण परिषद जबरदस्त सूत्रसंचालन व प्रेरणादायी चारोळ्या shikshan parishad marathi anchoring
मान्यवरांचे स्वागत करताना वापरायची चारोळी
कर्तुत्व ज्यांचे सागराप्रमाणे,
ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे
फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने
स्वागत करूयात मान्यवरांचे,
शब्द सुमनांच्या पारिजाताने……
_____________________________
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||
_____________________________
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी ।
नजरेत सदा नवी दिशा असावी ।
घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही |
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी || 2 ||
_____________________________
मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो में जान होती है, पंखों से कुछ नही होता हौसलों से उड़ान होती है।
_____________________________
लहरों से डर कर नौका पार नहीं होती |
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ||
_____________________________
प्रस्तावना
केंद्राचे धडाडीचे व कर्तव्यनिष्ठ केंद्रप्रमुख, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले विषयसाधन व्यक्ती (बीआरसी तज्ञ), शिक्षण परिषदेत उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने सहर्ष स्वागत करते..
अध्यक्षीय निवड
लाख लाख नजरांवरती कर्तुत्ववानाचं राज्य असतं
स्वतःच्या जखमा पुसून समाजहितासाठी झगडायचं असतं.
असे स्वतःच्या अडीअडचणी बाजूला सारून शाळेच्या विकासासाठी, शाळेच्या प्रगतीसाठी, गुणवत्तेसाठी सदैव झटणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री…………..यांनी आजच्या शिक्षण परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते..
अनुमोदन
आत्ताच सौ……………. मॅडम यांनी जी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे निवड केली त्या निवडीला सर्वानुमते मी अनुमोदन देते.
प्रतिमापूजन
करुनी देशाचा विकास सावित्री तू झालीस क्रांतीज्योती तुझ्या चरणी लीन होऊनी गातो तुझ्या कार्याची महती भारतीय पहिली महिला शिक्षिका, ज्योतिबांची सावली, तुम्हा-आम्हा सर्वांची माऊली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते.
दिपप्रज्वलन
अज्ञानरूपी अंधार भेदून, अग्निला अलिंगन देऊन, स्वतःला जाळून साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योतीसाठी आपण ही एक ज्योत पेटवूयात…
सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीपप्रज्वलन करावं
ईशस्तवन
निर्गुण निराकार परमेश्वराने या सर्व चराचराचा अणूरेणू पूर्णपणे व्यापलेला आहे. अशा या परमेश्वराला आठवण्यासाठी ईशस्तवन सादर करावं हि आमच्या विद्यार्थिनींना विनंती……
स्वागतगीत
सर्व मान्यवरांनी मंचावर विराजमान व्हावे ही विनंती आणि पुनश्चः एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत…..
आगतम्-स्वागतम्-सुस्वागतम्…
मनामनाच्य गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली
स्वागतास खास आपल्या वाहतो हि सुमनांजली…
सत्कार समारंभ
दुसऱ्याला प्रकाशित करण्यासाठी स्वतः ज्योतीसम जळत रहा
जळण्यातही आनंद त्यांच्या मनाचा मोठेपणा पहा…
शाळेच्या विकासासाठी सदैव झटणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री——यांचा सत्कार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री——-यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते.
सत्कार समारंभ
कार्य आपुले असे महान
वर्णू किती महिमा छान
करितो मुजरा ठेवूनी मान
स्विकारावा सत्कार सन्मान……..
आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री—— यांचा सत्कार आमच्या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री——यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते…
प्रास्ताविक
नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी
माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी
अशा शिक्षकांच्या विचारांची, उपक्रमांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी आयोजित शिक्षण परिषदेतचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री ……………यांना….
आदर्श परिपाठ
धुक्याची चादर घेऊन पहाट व्हावी
कोकिळेच्या भूपाळीने जाग यावी
उगवत्या नारायणाची लाली न्याहाळावी
गोठ्यातील कपिलेची धार चाखावी……
त्याप्रमाणे शिक्षण परिषदेत परिपाठाची धुण अनुभवावी….
आमच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी परिपाठ सादर करावा.
बालसेवेचा घेतला आहे ज्यांनी सदैव वसा
रात्रंदिवस मेहनत घेतात उमटतो त्यांच्या कार्याचा ठसा
असे बालकप्रेमी, नवनवीन शैक्षणिक प्रयोग करणारे, एक यशस्वी सुलभक, गुणवत्ता वाढीचा मंत्र जपणारे आपले अध्यापनशास्त्रीय कौशल्य सादर करण्यासाठी या ठिकाणी पाठ सादर करत आहेत.
मार्गदर्शन
शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच.. ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात ज्ञानाची पानं… त्यांच्या छायेखाली सौख्य लाभतं….. अज्ञानाच्या उन्हात थिजत असलेल्यांना ज्ञानाचा प्रकाश मिळतो…. त्यांच्या रेषेखाली लटकलेले असतात इवल्याशा चेहऱ्याचे निरागस अक्षरे…. तोच तर बाहेर काढतो चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज…. तोच तर असतो खरा समाजसुधारक… अशाच नवनवीन अध्यापन कौशल्यांचे, उपक्रमांचे सादरीकरण करण्यासाठी मी आमंत्रित करिते श्री…………..यांना
येतील वादळे, खेटेल तुफान तरी वाट चालतो काही अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही…..
अशा जोमाने शून्यातून शाळेचे रूपडे बदलविणारे गुणवत्ता वाढविणारे आदर्श शिक्षक मा.श्री…………….आपल्याला मार्गदर्शन करतील.
उपक्रम सादरीकरण
सर तुम्ही घेता विद्यार्थी विकासाचा ध्यास
नवनवीन उपक्रमातून साधता गुणवत्ता हमखास.
सर तुम्ही चालविता चळवळ…..
समाजकार्याची कार्यातून तुमच्या दिसते गुणवत्तेची तळमळ….
मंजिले उन्हीं को मिलती है। जिनके सपनों में जान होती है। पंखो से कुछ नहीं होता । हौसलो से उडान होती हैं।
मॅडम तुम्ही झालात गोरगरिबांच्या माता सामाजिक, शैक्षणिक कार्यातून दिसते तुमची गुणवत्ता….
ध्येयाला तुमच्या, लाखो पंख यशाचे प्रवासी जीवनाचे, स्वप्न गुणवत्तेचे होण्या यशस्वी पाखरा, घ्यावी भरारी आमचे शब्द तुम्हाला, लाख लाख शुभेच्छांचे..
करुनी सेवा बालमनाची अखंड तेवते वात सेवेची माणुसकीचा झरा वाहतोय वागणूक आहे विनम्रतेची..
गुणवत्तेची हमी दिली समाज उद्धाराची दारे उघडली सरांच्या अथक परिश्रमाने वाडी, वस्ती सुखावली….
केंद्रप्रमुख मार्गदर्शन
सामर्थ्याने सातत्याने तुम्ही बांधा पूजा कष्टाची तुमची ओळख होईल तुम्हाला नित्य नव्या ध्येयाची….
शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतील सन्माननीय केंद्रप्रमुख श्री…
आभार प्रदर्शन
मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो म्हणूनच आम्ही आपले हृदयापासून आभार मानतो..
आभार चारोळ्या खालील प्रमाणे
आभाराचा भार कशाला…
गळा-फुलांचे हार कशाला…
हृदयामध्ये घर असावे…
त्या हृदयाला दार कशाला…
आजच्या शिक्षण परिषदेस उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार ……. यांनी मानावेत, अशी मी त्यांना विनंती करत आहे.
________________________________
लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखराता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।








