समग्र प्रगती पुस्तक (Holistic Progress Card-HPC) उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत अहवाल सादर करणेबाबत
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. रार्शसंवप्रपमप/HPC वितरण सूचना/२०२५-२६/०२८८१ दिनांक १३.०५.२०२५
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. SCERT-३८.०/४२/२०२६-EVALUATION ४१८१५६०३/२०२६ दिनांक २८.०३.२०२६
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परख मार्फत NCERT, PARAKHव भारत सरकारने सन २०२४-२५ पासून सर्व विद्यार्थ्यांना (HPC) Holistic Progress Card उपलब्ध करून देण्याविषयी निर्देशित केले आहे. त्यानुसार संदर्भ क्र. १ नुसार पथदर्शी प्रकल्प म्हणून STARS अंतर्गत समग्र प्रगती पुस्तकाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीसाठी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या ११.४७.९९२ विद्यार्थ्यांना समग्र प्रगती पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे ८६ हजार शिक्षकांना शिक्षक मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ८२७ पीएम श्री शाळांमधील इयत्ता पहिली व दुसरी च्या एकूण ६०१३० विद्यार्थ्यांना विद्यार्थी पुस्तिका व ८२७ शिक्षकांना शिक्षक पुस्तिका वितरीत करण्यात आले आहेत. दशैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सदर प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. PM SHRI योजनेअंतर्गत राज्यातील PM SHAI शाळांमध्ये पूर्वतयारी स्तरावरील ३५,८८१ विद्यार्थी व ८२७ शिक्षक, तसेच पूर्वमाध्यमिक स्तरावरील ३०,५४२ विद्यार्थी व ८२७ शिक्षक यांना पुस्तिका वितरीत करण्यात आल्या आहेत. याची परिणामकारकता तपासण्याची जबाबदारी जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या वर संदर्भ क्र.१ व २ नुसार सोपविण्यात आली होती,
समग्र प्रगती पुस्तक (Holistic Progress Card-HPC) उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत अहवाल सादर करणेबाबत pdf download
समग्र प्रगती पुस्तक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीचेच नव्हे, तर भाषिक, गणितीय, सामाजिक, भावनिक, कलात्मक, क्रीडा आणि जीवनकौशल्यांच्या विकासाचे सर्वकष मूल्यमापन करण्यासाठी शाळांमध्ये प्रभावी व्यवस्था निर्माण झाली आहे. तसेच शिक्षकांमध्ये क्षमता-आधारित मूल्यमापनाची समज विकसित होऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील अपेक्षित मूल्यमापन पद्धतीच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना
मिळाली आहे. या अनुषंगाने, समग्र प्रगती पुस्तकाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी संबंधित प्राचार्य (DIET), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडक शाळांना भेटी देऊन शिक्षकांकडून समग्र प्रगती पुस्तकाचा नियमित व उद्देशानुरूप वापर होत असल्याची पडताळणी करावी. विशेषक्त प्रत्येक विद्याथ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील निरीक्षण नोंदी, मूल्यमापन नोंदी व अभिप्राय नियमितपणे नोंदविण्यात येत आहेत किंवा नाही, तसेच समग्र प्रगती पुस्तकातील नोंदींचा वापर अध्यापन नियोजन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आणि आवश्यक शैक्षणिक हस्तक्षेपासाठी केला जात आहे किंवा नाही, याची खात्री करावी.
तरी त्यासाठी आपण जिल्ह्यातील किमान १५ ते २० शाळांमध्ये (ज्या शाळांमध्ये समग्र प्रगती पत्रक वितरीत केले आहे त्या शाळा फक्त) HPC अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली आहे. पडताळणीदरम्यान आढळून आलेल्या उत्कृष्ट कार्यपद्धती, अडचणी, आवश्यक सुधारणा, तसेच शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सूचना यांचा जिल्हानिहाय संक्षिप्त अहवाल तयार करून आवश्यक छायाचित्रे व पुराव्यासह लेखी अहवाल दिनांक २० सप्टेंबर २०२६ पर्यंत या विभागाच्या evaluationdept@maa.ac.in या ई मेल वर सादर करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
(मूळ टिपणी मा. संचालक यांनी मान्य केली आहे)










