सूचना पत्र क्र. १५ सेवांतर्गत बी. एड. (P108) सन २०२६-२८ या तुकडीचे खुल्या व राखीव प्रवर्गातील (द्वितीय) प्रवेश फेरी सूचना ycmou b.ed second round instructions
सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२६-२८ या तुकडीसाठी प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या प्रवेशेच्छुक अर्जदारांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची मूळ कागदपत्रे पडताळणी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर घेण्यात आली.
प्रथम कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र झालेल्या अर्जदारांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार खुल्या आणि राखीव प्रर्वागातील अर्जदाराच्या प्रवेशासाठी यादी स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे.
१) निवड यादीतील अर्जदारांनी त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क रू. २३,४२८/- (माहितीपुस्तिकेतील पान क्र. २१ वर नमूद केल्याप्रमाणे) दिनांकः १६ सप्टेंबर २०२६ (रात्री ११.५९ PM पर्यंत) ऑनलाईन पद्धतीने डेबिट/क्रेडीट कार्ड, नेटबँकिंग यूपीआय इत्यादीचा वापर करून भरावयाचे आहे. सदर प्रथम वर्ष शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय संबंधित अर्जदाराच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे. प्रथम वर्षाचे शुल्क भरल्यानंतरच आपला बी. एड. शिक्षणक्रमाचा सन २०२६-२०२८ या तुकडीसाठी प्रवेश निश्चित होईल. अर्जदारांनी विहित मुदतीत प्रथम वर्ष शुल्क न भरल्यास संबंधित अर्जदार बी. एड. प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया अर्जदारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे बी.एड. प्रवेशासाठी निवड झालेल्या अर्जदाराने वर दिलेल्या मुदतीतच प्रवेश घेणे अनिवार्य आहे.
२) प्रथम वर्ष शुल्क यशस्वीपणे भरणाऱ्या अर्जदारांना आपल्या नोंदणीकृत (E-mail.ID) मेल आयडीवर पावती मिळेल. त्याच्या दोन प्रती काढून त्यातील एक प्रत आपल्या जिल्ह्यासाठी नियुक्त बी. एड. अभ्यासकेंद्रावर (माहितीपुस्तिकेतील पान क्र. २३ ते २६ वर नमूद केलेल्या ठिकाणी) जाऊन जमा करावे. तसेच पुढील पत्रव्यवहारासाठी संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा व कायमस्वरूपी पत्ता, मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती अभ्यासकेंद्रावर देण्यात यावी.
३) अभ्यासकेंद्रामार्फत आपणास बी. एड. शिक्षणक्रमातील अध्ययन साहित्य प्रथम संपर्कसत्रात देण्यात येईल. वैकल्पिक अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि पूरक अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर Books: Free Download (PDF) या टॅबवर सॉफ्टकॉपीमार्फत PDF/E-book स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत, याची नोंद घ्यावी.
४) आपण वर दिलेल्या मुदतीतच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जागा रिक्त राहिल्यास त्याच जिल्ह्यातील कागदपत्रे पडताळणी झालेल्या पुढील अर्जदारांना गुणवत्तेनुसार संधी देण्यात येईल.
५) अर्जदारांना बी.एड. सन २०२६-२८ प्रथम वर्ष शुल्क भरताना काही अडचण आल्यास कृपया ०२५३-२२३१७१४, २२३१७१५, २२३०१०६, २२३०५८० या क्रमांकावर (अर्ज माहिती / Login details निशी) संपर्क साधावा.











