०५ सप्टेंबर शिक्षक दिन सोपे भाषण speech on teacher’s day 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

०५ सप्टेंबर शिक्षक दिन सोपे भाषण speech on teacher’s day 

शब्दांनी ज्ञान वाढविणारे जगण्यातून जीवन घडविणारे सत्याचा मार्ग दाखविणारे प्रामाणिकपणाची शिकवण देणारे आयुष्यभराला पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक…

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणीनों आज 5 सप्टेंबर, शिक्षक दिन. डॉ सर्वपल्ली राधाकृष्ठान यांचा जन्म दिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.

आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान किती अनमोल आहे प्रत्येकांना माहितच आहे. ज्या प्रमाणे कंभार मातीला आकार देऊन सुंदर, मनमोहक मूर्ती बन‌वितो, त्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्याथ्यांना आकार देत जगण्याची कला शिकवितात.

जीवन हे ईश्वराचं देणं आहे. जीवन हे ईश्वराचं देणं आहे पण जगणे ही शिक्षकाची भेट आहे.

फक्त एक पेन, एक खडू, एक फळा, एक कागद वापरुन जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान क्षणात आमच्या समोर ठेवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांचे आभार शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

शिक्षकांची महिमा मी कधीच काही शब्दात व्यक्त कर शकत नाही. जिथे माझ्यापाठीमागे गुरु आहे तिथे नेहमी माझ्यासाठी सगळे मार्ग खुले आहेत असा अढळ विश्वास मला आहे.

शिक्षक दिनानिमित्त माझ्या सर्व गुरुवर्य यांना हार्दिक शुभेच्छा

Related posts:

Leave a Comment