वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत varishtha vetan shreni training
संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/ प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१
२. या कार्यालयाचे दिनांक ०८/०९/२०२६ चे पत्र
उपरोक्त संदर्भा क्र. २ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक ०९.०९.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक १६.०९.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहणार होते. ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ करण्यात आली असून सदरहू पोर्टलवर दिनांक २०.०९.२०२६ सायंकाळी ०६.०० पर्यंत नावनोंदणी करता येईल. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.


![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)







