जेष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारी प्रवाशांना दि. ०१ सप्टेंबर २०२६ पासुन अनिवार्य केलेल्या NCMC कार्डबाबत ncmc card paripatrak
संदर्भ –
१. क्र.राप/वाह/एनसीएमसी कार्ड/५३०९, दि.३१/८/२०२६.
२. क्र.राप/वाह/एनसीएमसीकार्ड/५३४९, दि.०२/०९/२०२६.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ पासून रा.प. महामंडळाद्वारे देण्यात आलेले NCMC कार्ड ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना अनिवार्य करण्यात येत आलेले आहे. सद्यस्थितीत NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने प्रवासी संख्येमुळे NCMC कार्ड कार्यप्रणालीच्या सर्व्हरवर वाढलेल्या Hits मुळे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना प्रवासा दरम्यान सवलतीचे तिकीट देण्यास अडचणी येत असल्याने, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना करण्यात आलेल्या NCMC कार्ड अनिवार्यतेस दि.३०.०९.२०२६ पर्यंत मुदत वाढ देण्यास मा. सक्षम प्राधिकारी यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे.
सबब आपणांस याद्वारे कळविण्यात येते की, दि.३०.०९.२०२६ पर्यत ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना यापुर्वी देण्यात येणा-या प्रचलित कार्यपद्धतीनुसार रा.प प्रवास सवलतीचे तिकीट देण्याबाबतच्या सुचना आपल्या अखत्यारितील येणा-या सर्व आगार व्यवस्थापक यांना अवगत करुन आगारातील सर्व वाहक तसेच चालक तथा वाहक यांना सुचना देणेबाबत कळविण्यात यावे. तसेच ज्या लाभार्थ्यांकडे Active NCMC कार्ड आहे त्यांस सदर कार्ड मधूनच रा.प प्रवास सवलतीचे तिकीट देण्यात यावे.









