जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पद (प्राथमिक) येथे अंशकालीन निदेशक / शिक्षक (क्रीडा) यांचे समायोजना बाबत anshkalin nideshak paripatrak
संदर्भः-
१. आपले उक्त विषयाचे निवेदन दिनांक १०/४/२०२६ प्राप्त दि. १९/६/२०२६
२. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५ / (प्र.क्र. १६/१५)/ टीएनटी-२ दिनांक १५/३/२०२४
३. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र ९३९/टीएनटी-२ दिनांक ०२-०१-२०२६
४. मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक ६४६३ /२०२६ मधील शासन निर्णय दि. २५/८/२०२६
उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपण व इतर यांनी शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक २ जानेवारी २०२६ अन्वये जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची संख्या ४८६० निश्चित करून सदर पदे भरणे करीता कार्यवाही सुरू केली आहे. सदर पदाकरीता लागणारी शैक्षणिक व व्यावसायीक अर्हता अर्जदार अंशकालीन निदेशक शिक्षक क्रीडा यांच्याकडे असल्याने सदर अर्जदार यांना जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदावर केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) या पदावर समायोजित करण्यात यावे व त्या आशयांचे नियुक्ती / बढती आदेश अर्जदार यांना निर्गमित करण्यात यावे अशी विनंती केली आहे.
संदर्भ क्रमांक २ वरील दिनांक १५/३/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील परि ५.४ अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येक १ पद मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच संदर्भ क्रमांक ४ वरील शासन निर्णय दिनांक ०२/०१/२०२६ अन्वये एकूण ४८६० पदे क्रीडा शिक्षक पदे एकूण मंजूर पदांमधून राखून ठेवण्यात आलेले आहेत.
सदर पदे ही केंद्र शाळांतर्गत शाळांतील क्रीडा विषयक कामकाजासाठी केंद्र शाळास्तरावर मंजूर करण्यात आलेले आहे. सदर पदे भरण्याबाबत सेवाप्रवेश नियम निश्चित झालेले नाहीत.
आपण कार्यरत असलेले अंशकालीन निदेशक ही पदे आरटीई २००९ मधील तरतूदीनुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये इ. ६ वी ते इ. ८ वी गटाकरिता अंशकालीन निदेशक क्रीडा, कला व कार्यानुभव ही पदे मंजूर आहेत. अंशकालीन निदेशक ही पदे कंत्राटी स्वरूपाची असून इ. ६ वी वे इ. ८ वी गटातील १०० पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक शाळेकरीता अंशकालीन असून त्यासाठी रुपये १२०००-१८००० मानधन तत्वावरील आहेत. याबाबत शासन निर्णय दिनांक ०५/०६/२०२५ नुसार अंशकालीन निदेशक पदांच्या सेवा शर्ती, पात्रता, मानधन इत्यादी बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपली वा अर्जदार यांची सेवा मानधन तत्वावर सुरू आहे.
केंद्र शाळास्तरावर केद्र शाळेतर्गत शाळांतील क्रीडा विषयक कामकाजासाठी नव्याने स्वंतत्रपणे पूर्णवेळ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. सदर पदे सरळ सेवा प्रवेशाने भरावयाची आहेत. त्यामुळे आपणास सदर केद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा या पदावर समायोजित / बढती आदेश देता येणार नाहीत. तरी आपले दि १०/४/२०२६ रोजीचे निवेदन निकाली काढण्यात येत आहे.










