उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) पुढे ढकलण्याबाबत flnat ullas navbharat kshakshrta karyakram 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) पुढे ढकलण्याबाबत flnat ullas navbharat kshakshrta karyakram 

संदर्भ:-

1. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग (प्रौढ शिक्षण ब्यूरो), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. F. No. 14-1/2023-AE-4, दिनांक 31 जुलै 2026.

2. या कार्यालायचे पत्र दि. 21/08/2026

3. शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे पत्र दि. 01/09/2026

महोदय,

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले आहे की, उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५,०० या वेळेत ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार होती. सदर परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आवश्यक पूर्वतयारी, परीक्षा केंद्र निश्चिती, परीक्षार्थीची नोदणी/यादी, भौतिक व प्रशासकीय व्यवस्था तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय करण्याबाबत आवश्यक सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत. मात्र, काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेली सदर FLNAT परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी सदर परीक्षेच्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवावी. तसेच, परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्राशी संबंधित अधिकारी/कर्मचारी व इतर संबंधित घटकांना याबाबत योग्य ती माहिती देऊन, सदर परीक्षेबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर FLNAT परीक्षेची सुधारित तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर तो स्वतंत्रपणे यथावकाश कळविण्यात येईल. सुधारित तारीख व वेळ प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील.

तरी, सदर बाबीची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.

Related posts:

Leave a Comment