शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथे प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्याबाबत government medical college
महाराष्ट्र शासन
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
शासन निर्णय क्रमांकः एमईडी २०२६/प्र.क्र.२९१/ई-११०३२०४/२६/शिक्षण १
९ वा मजला, गो.ते. रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४००००१ तारीखः १६ सप्टेंबर, २०२६
वाचा:-
१) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन निर्णय क्र.एमईडी-२०२५/प्र.क्र.२१८/
ई-११०३२०४/२५/शिक्षण-१, दिनांक २३.०५.२०२५.
२) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे द्वितीय अपील आदेश क्र. V.11013/66/2026-ME-1, दिनांक १५.०९.२०२६.
प्रस्तावना:-
अहिल्यानगर येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यास संदर्भ क्रमांक (१) येथील शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली आहे. सदर संस्थेस शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह परवानगी नाकारण्यात आली असून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांनी देखील प्रथम अपील फेटाळले आहे. तदनंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी संदर्भ क्रमांक (२) येथील आदेशात नमूद केल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय या संस्थेस शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह विद्यार्थी प्रवेशित करण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी संदर्भ क्रमांक (२) येथील आदेशात नमूद केल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय या संस्थेस शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह विद्यार्थी प्रवेशित करण्यास पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.
अटी व शर्ती:-
१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार १०० इतकी राहील.
२) सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे संलग्निकरण प्राप्त करुन घेण्यात यावे व तद्नंतर विद्यार्थी प्रवेशित करण्यात यावेत.
३) राज्य शासन/केंद्र शासन/मा. सर्वोच्च न्यायालय अथवा मा. उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेली कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी.
४) केंद्र शासन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली व राज्य शासन यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत वेळोवेळी केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे तसेच उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता विहित कालावधीत करणे बंधनकारक राहील.
५) नयेत. कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशीत करू
६) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेली परवानगी ही सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता असून तद्नंतर सदर परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करुन घेणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षात नव्याने विद्यार्थी प्रवेशित करण्यापूर्वी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून परवानगीचे नूतनीकरण करुन घेणे बंधनकारक राहील.
७) सदर शासन निर्णय हा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी संदर्भ क्रमांक (२) येथील पत्रान्वये दिलेली परवानगी तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ मधील कलम ६४ नुसार शासनास प्रदत्त अधिकाराचा वापर करुन निर्गमित करण्यात येत आहे.
८) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०९१६१०५८५००३५१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.










