माहितीचा वार शनिवार” या शासन निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत mahiticha vaar shanivar paripatrak
संदर्भ: १. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्याध्यक्ष यांचे निवेदन दि. ०६.०८.२०२६
२. शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/८०३/संकीर्ण/ २०२६ दि. २५.०८.२०२६
३. मा. आयुक्त कार्यालय यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.-प्राथ/निवेदन/२०२६/२११४०३६ दि.०२.०९.२०२६
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये “माहितीचा वार शनिवार” या शासन निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत मा. आयुक्त कार्यालय यांचे पत्र प्राप्त झाले आहे. मा. आयुक्त कार्यालय यांचे दिनांक १४ जून २०२६ रोजी निर्गमित केलेल्या आदेशान्वये शालेय स्तरावर मागितलेली सर्व प्रकारची ऑनलाइन/ऑफलाइन माहिती दर शनिवारीच सादर करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सदर आदेशात अपवाद म्हणून केवळ विद्यार्थी उपस्थिती, PM Poshan आहार नोंद, तसेच आपत्कालीन / विधीमंडळाशी संबंधित माहिती दररोज सादर करण्याची तरतूद आहे.
तथापि, प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये अजूनही दररोज विविध प्रकारची माहिती मागवली जात असल्याचे संदर्भीय पत्रान्वये कळविले आहे. तरी उपरोक्त प्रकरणी निवेदनाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करून व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सोबतः प्रत संलग्न











