बिंदूनामावली तपासणीकरिता सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समितीस मुदतवाढ देण्याबाबत bindunamavali checking software paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बिंदूनामावली तपासणीकरिता सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समितीस मुदतवाढ देण्याबाबत bindunamavali checking software paripatrak 

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग ज्ञापन क्रमांक : संकीर्ण:- २०२३/प्र.क्र.८५/(ई-नस्ती क्र. १४२२९४८)/आरक्षण-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- २१ सप्टेंबर, २०२६

संदर्भ:- सामान्य प्रशासन विभाग, शासन ज्ञापन क्रमांक, संकीर्ण:- २०२३/प्र.क्र.८५/(ई-नस्ती क्र. १४२२९४८)/आरक्षण-३, दि. २५.०६.२०२६.

ज्ञापन:-

या विभागाकडून करण्यात येणारे बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीचे कामकाज जलद गतीने व अचूकपणे पार पाडण्यासाठी संगणकीय बिंदूनामावली प्रणाली तयार करण्यासाठी सहायक आयुक्त, मावक, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भाधीन दि. २५/०६/२०२६ रोजीच्या शासन ज्ञापनान्वये Software Development Domain Expert Committee स्थापन करण्यात आली आहे.

२. उपरोक्त शासन ज्ञापनानुसार संगणकीय बिंदूनामावली प्रणाली दि. १५ ऑगस्ट, २०२६ पूर्वी कार्यान्वित होईल यासाठी समितीने वेळोवेळी बैठका घेऊन कामकाज केले आहे. मात्र बिंदूनामावली प्रणाली तयार करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे सदर कामकाज अद्याप पूर्ण झालेले नाही. सबब, या शासन ज्ञापनान्वये Software Development Domain Expert Committee ला दि. २ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२६०९२११२३९००४२०७ असा आहे. हे ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment