“Maha-UPLABDHI” (महा-उपलब्धी) या मोबाईल अॅपमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Online Life Certificate) ही सुविधा उपलब्ध करून देणेबाबत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha-UPLABDHI” (महा-उपलब्धी) या मोबाईल अॅपमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Online Life Certificate) ही सुविधा उपलब्ध करून देणेबाबत

संदर्भ: शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.संकीर्ण २०२६/प्र.क्र.४१/कोषा प्रशा-४, दि. १९.०६.२०२६

उपरोक्त शासन निर्णयान्वये निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी दि.०१.०७.२०२६ पासून “Maha-UPLABDHI” (महा-उपलब्धी) या मोबाईल अॅप कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या अॅपच्या प्रथम टप्प्यात निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना Pension Payment History, Income Certificate, e-PPO Library, Form-१६ इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

या अॅपच्या द्वितीय टप्प्यामध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Online Life Certificate) ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विकसन करण्यात आलेले असून माहे नोव्हेंबर-२०२६ साठीचे जीवन प्रमाणपत्र “Maha-UPLABDHI” (गहा-उपलब्धी) या मोबाईल अॅपद्वारे स्विकारणे प्रस्तावित आहे. यामुळे निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार आहे.

या सुविधेचा लाभ निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना व्हावा, यासाठी जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी “Maha-UPLABDHI” (महा-उपलब्धी) या मोबाईल अॅप त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कोषागार कार्यालयांतील निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी “Maha-UPLABDHI” (महा-उपलब्धी) या मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी व्यापक प्रसिध्दी करणेबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे, असे गा. संचालक महोदयांनी निर्देश दिलेले आहेत.

तरी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कोषागार कार्यालयांना याबाबत सूचित करण्यात यावे, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment