नागरी स्थानिक स्वराज संस्थामधील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविणेबाबत safai kamgar samasya adachani paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागरी स्थानिक स्वराज संस्थामधील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविणेबाबत safai kamgar samasya adachani paripatrak 

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: सफाई-२०१६/प्र.क्र. ३७०/नवि-२०

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: २७ सप्टेंबर, २०१६.

वाचा :

१) शासन परिपत्रक, नगर विकास विभाग क्रमांक: जीईएन १०८९ १३७९/सीआर १९३/नवी-१४, दिनांक ९ ऑक्टोबर, १९८९

२) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक :-सफाई-२०११/प्र.क्र.३२७/विघयो-२, दिनांक २१ ऑक्टोबर, २०११

प्रस्तावना :-

राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविणेबाबत मा. मंत्री (सामाजिक न्याय) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २०.०८.२०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न शासनाच्या विचाराधीन होते त्यासंबंधी पुढील सूचना देण्यात येत आहेत. सदर सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

शासन परिपत्रक :-

१) शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्रमांक जीईएन १०८९/१३७९/सीआर १९३/नवी-१४, दि. ०९ ऑक्टोबर, १९८९ अन्वये राज्यातील महानगरपालिका / नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टया देण्यात याव्या. तसेच सुट्टीच्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांना काम करणे अपरिहार्य असल्यास त्यांना आर्थिक मोबदला महानगरपालिका /नगरपालिकांनी द्यावा. त्याप्रमाणे त्यांनी उपविधी तयार करावेत व संबंधीत अधिकाऱ्यांकडून मंजूर करून द्यावेत.

२) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांकः सफाई -२०११/प्र.क्र.३२७/विघयो-२, दिनांक २१ ऑक्टोबर, २०११ अन्वये लाड पागे समितीच्या धोरणानुसार सफाई कामगार नोकरी करीत असताना त्याला चतुर्थ श्रेणीतच पदोन्नती मिळाल्यास वारसा हक्काच्या नियमास बाधा आणू नये.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०९२७१६४२४०७४२५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment