सन २०२६-२७ च्या संचमान्यता अनुषंगाने कामकाजाबाबत sanchmanyata paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ च्या संचमान्यता अनुषंगाने कामकाजाबाबत sanchmanyata paripatrak 

संदर्भ :- शिसंमा/२०२६-२७/सरल प्रणाली/टि-८/ई३०८३२९१/२१११०५३, दि.०१.०९.२०२६

उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२५-२६ च्या संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय दि. १५.०३.२०२४ व शासनस्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्राची संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ च्या सुधारित संचमान्यता निकषांनुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येणार असून यु-डायस पोर्टल व सरल पोर्टलवरील शाळा, तुकडी, माध्यम, शाळा व्यवस्थापन प्रकार, कार्यरत पदे, विद्यार्थी तपशिल, विद्यार्थी आधार प्रमाणिकरण व इतर माहिती अद्यावत करणेबाबत संचालनालयाचे पत्र दि.०१.०९.२०२६ अन्दये तसेच वारंवार ऑनलाईन व्ही.सी. व्दारे निर्देश देण्यात आले आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रातील संच मान्यता उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय स्टुडंट पोर्टल व स्कूल पोर्टलवरील कामकाज प्रलंबित शाळा संख्यानुसार युडायत्त पोर्टल व सरल पोर्टलमध्ये स्टुडंट पोर्टलवरील इयत्ता, माध्यम, शाखा बाबत तसेच स्कूल पोर्टलवर इयत्ता, व्यवस्थापन, माध्यम मेंपिंग प्रलंबित असून त्याबाबत पडताळणी करुन प्रलंबित कामकाज तातडीने पूर्ण करावे.

Related posts:

Leave a Comment