जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या नवीन पोर्टलबाबत caste validity certificate new portal circular
जात प्रमाणपत्र पडताळणी ची कार्यप्रणाली नव्याने विकसित झाली आहे. त्याअनुषगाने सर्व समित्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या कार्यालयात कोणताही अर्जदार, पालक व अभ्यंगत प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यक्ता नाही याबाबत आपल्या समितीस्तरावर प्रत्यक्षदर्शनी भागात मोठ्या अक्षरातील फलक दि.१६.१०.२०२६ रोजी तात्काळ लावण्यात यावे.
फलक मजकुर “जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यप्रणाली नव्याने विकसित करण्यात आली आहे. असुन पुर्णतः ऑनलाईन असल्यामुळे अर्जाबाबत समिती कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. अर्जा बाबत काही माहिती/मार्गदर्शन हवे असल्यास आपण बार्टी मुख्यालय पुणे येथील मदतकक्ष (Helpdesk) ०२०-२६३३३३३९ या क्रमांकावर फोन अथवा ९४०४९९९४५२ या WhatsApp क्रमांकावर व ईमेल आयडी helpdesk@barti.in यावर संपर्क साधावा.”











