“राष्ट्रीय जंतनाशक मोहीम (National Deworming Day)” राबविण्याबाबत
संदर्भ: सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अशासकीय पत्र क्र. संकिर्ण-१९२६/१८२/प्र.क्र.३०/कु.क.१, दिनांक १९ ऑक्टोबर, २०२६.
उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात दरवर्षीप्रमाणे सन २०२६-२७ या वर्षात १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुले व मुली यांच्याकरिता ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.
आतड्यांमधील कृमी दोषामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) आणि कुपोषणाचे प्रमाण वाढते, ज्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर आणि शैक्षणिक प्रगतीवर होतो. १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण स्थिती आणि जीवनाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने अंगणवाडी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खालील वेळापत्रकानुसार मोहीम राबविण्यात येणार आहे.
> राष्ट्रीय जंतनाशक दिन: मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर, २०२६
> मॉप-अप दिन (सुटलेल्या विद्यार्थ्यांसाठी): मंगळवार, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२६
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा, महानगरपालिका व तालुका स्तरावर खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावेः
१. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीः मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागामार्फत जिल्हा व तालुका पातळीवर तात्काळ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व नियमित मूल्यमापन करण्यात यावे. २. जिल्हा समन्वय समिती बैठकः जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समन्वय समितीच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य विभागाशी योग्य समन्वय साधावा.
३. विद्यार्थी संख्येची माहितीः शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांची अचूक संख्या तात्काळ स्थानिक आरोग्य विभागास उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून पुरेशा प्रमाणात जंतनाशक गोळयांचा (Albendazole Tablet) साठा आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येईल.
४. सर्व शाळांचा समावेशः जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था (जि.प./मनपा/नपा) शाळा, शासकीय अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, केंद्रीय/नवोदय/सैनिक/सीबीएसई शाळा, खाजगी इंग्रजी शाळा, मदरसे, मिशनरी शाळा, गुरुकुल, वसतिगृहे, बालगृहे तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालये व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (उदा. III, तंत्रनिकेतन इ.) प्रथम वर्षातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचा यात १००% सहभाग सुनिश्चित करावा.
५. प्रशिक्षणः प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) व नागरी आरोग्य केंद्रांच्या (UPHC/हेल्थ पोस्ट) वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून घ्यावे..
६. प्रसिद्धी व जनजागृतीः सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त होणारे प्रसिद्धी साहित्य व फलक शाळांच्या दर्शनी भागात व सूचना फलकावर लावून विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करावी.
७. क्षेत्रभेटी व सनियंत्रणः २७ ऑक्टोबर २०२६ व ०३ नोव्हेंबर २०२६ या दिवशी शिक्षण विभागातील विस्तार पर्यवेक्षकीय यंत्रणेने प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन देखरेख (Supervision) करावी. त्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा.
वरील सर्व सूचनांची आपल्या स्तरावरून काटेकोर अंमलबजावणी करून मोहिमेदरम्यान कोणतीही पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनी जंतनाशक गोळीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. सोबतः संदर्भिय पत्र.










