उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षांची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखांच्या मुदतवाढीबाबत ssc hsc online application circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षांची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखांच्या मुदतवाढीबाबत ssc hsc online application circular 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४

|| प्रकटन ||

विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षांची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखांच्या मुदतवाढीबाबत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याबाबतच्या तारखा यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने नियमित विद्यार्थी, तसेच पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित शुल्काने सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.

माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी शुल्क पावती, विद्यार्थ्यांच्या प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख सोमवार दिनांक ०७/१२/२०२६

१. सर्व माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College/School Profile मध्ये कॉलेज / शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना College/School Login मधून Pre-List उपलब्ध करून दिलेली असेल, Pre List ची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर Pre-List वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळाप्रमुख / प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

२. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने कशी भरावीत याबाबतच्या सर्व माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना (इ.१०वी) फेब्रुवारी मार्च २०२७ सूचना यापूर्वी विभागीय मंडळांमार्फत देण्यात आलेल्या आहेत.

३. सद्यस्थितीत दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांसाठी विलंब व अतिविलंब शुल्क याप्रमाणे आकारणी न करता सर्व आवेदनपत्रे नियमित शुल्क आकारून स्वीकारण्यात येतील. आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment