सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांकरीता वॉटर कुलिंग संच खरेदी प्रक्रिया राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत water cooling sanch circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांकरीता वॉटर कुलिंग संच खरेदी प्रक्रिया राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत water cooling sanch circular 

वाचा:-

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक बीसीएच-२०२६/प्र.क्र.४३०/शिक्षण-२ मंत्रालय विस्तार इमारत, पहिला मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- ०३ नोव्हेंबर, २०२६.

१. शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक भांखस-२०१४ प्र. क्र.८२/भाग-III/उद्योग- ४, दिनांक ०१.१२.२०१६.

२. आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचे पत्र क्र. सकआ/सोयी सुविधा/वॉटर कुलर संच पुरवठा/२०२६-२७/३४७८, दि.१४.१०.२०२६.

प्रस्तावनाः-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सद्यस्थितीत ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये मुलांची २३१ व मुलींची २१८ शासकीय वसतिगृहे सुरू आहेत. सदर शासकीय वसतिगृहांमध्ये २४,९५८ मुले व २१,७१५ मुलींची प्रवेश क्षमता आहे. याप्रमाणे विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये एकुण ४६,६७३ विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमता आहे. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शिक्षणासाठी ९२ शासकीय निवासी शाळा सुरू आहेत. सदर शासकीय निवासी शाळांमध्ये एकूण १४,६०० विद्यार्थी प्रवेशित आहेत. विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा मोलाचे कार्य करीत आहेत.

२. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमध्ये वॉटर कुलिंग संच बसविण्याबाबतचा प्रस्ताव उपरोक्त वाचा क्र. २ च्या पत्रान्वये आयुक्त, समाजकल्याण, पूणे यांनी सादर केला आहे. त्यानुसार, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमध्ये वॉटर कुलिंग संच बसविण्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) / महा ई-टेंडर पोर्टलव्दारे निविदा प्रक्रीया राबवून खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमध्ये वॉटर कुलिंग संच खरेदी करण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) / महा ई-टेंडर पोर्टलव्दारे निविदा प्रक्रीया राबवून एकूण रक्कम रु.१२,४४,६०,०००/- (अक्षरी रक्कम रुपये बारा कोटी चव्वेचाळीस लाख साठ हजार फक्त) इतक्या रक्कमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमध्ये खरेदी करावयाच्या वॉटर कुलिंग संचाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे:-

३. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमध्ये खरेदी करावयाच्या वॉटर कुलिंग संचाचा तांत्रिक विनिर्देशाचा (Technical Specifications) तपशिल खालीलप्रमाणे आहे:-

४. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमध्ये खरेदी करावयाच्या वॉटर कुलिंग संचाच्या प्रस्तावास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

(१) आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमध्ये वॉटर कुलिंग संच बसविण्याकरीता सदर संच खरेदी करण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) / महा ई-टेंडर पोर्टलव्दारे निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.

(२) आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय, दि.०१.१२.२०१६ व त्यानुषंगाने यासंदर्भात त्या विभागाने वेळोवळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका यामधील अटी व शर्ती आणि तरतुदीनुसार विहीत करण्यात आलेल्या कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात यावी.

(३) आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी उक्त परि. क्र. ३ मध्ये दिलेल्या तांत्रिक विनिर्देशानुसारच वॉटर कुलिंग संच खरेदी करण्याची दक्षता घ्यावी.

(४) आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी प्रस्तावित खरेदी करावयाच्या वॉटर कुलिंग संचाचे खरेदीचे दर प्रक्रियेअंती निश्चित करण्यात यावेत. सदर दर हा बाजार भावापेक्षा कमी असल्याबाबत व संबंधित पुरवठादाराने सदर संचाचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केला आहे, त्या दरापेक्षा जास्त नसल्याबाबत खातरजमा करावी.

(५) आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी ई-निविदेतील निम्नदर प्राप्त ई-निविदाधारकांचे प्रस्ताव शासन स्तरावरील राज्यस्तरीय प्रशासकीय खरेदी समितीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात यावे.

५. सदर वॉटर कुलिंग संच खरेदी करण्याकरीताचा खर्च “मागणी क्र. एन-३, प्रधानशीर्ष २२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण, २७७-शिक्षण, (०१) (०६) मागासवर्गीय शैक्षणिक संस्थावरील सोयी-सुविधा वाढविणे (अ.जा.उ.यो.) (कार्यक्रम) लेखाशिर्ष २२२५७ ४६६, ३१- सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उदिष्टाखाली सन २०२६-२७ या वर्षात उपलब्ध होणाऱ्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

६. सदर निर्णय, शासन निर्णय, क्रमांकः विअप्र-२०२६/प्र.क्र. २२/विनियम, दिनांक ११.०८.२०२६, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उपविभाग-दोन, अ.क्र.५, परि. क्र. ७, भाग-पहिला, उपविभाग-तीन, अ.क्र. ४. परि. क्र. २७ (२) (अ), अ.क्र.६०, नियम क्र.१६९ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२६११०३१८२१२४३४२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येत आहे.

VIVEK RAMESH SHINDE

(विवेक शिंदे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

१) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.

२) मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

३) मा. उप मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

४) मा. मंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

५) मा. राज्यमंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

६) प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.

७) आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे.

८) महालेखापाल (लेखा परिक्षा) / (लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.

९) महालेखापाल (लेखा परिक्षा) / (लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.

१०) प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग (प्रादेशिक) (सर्व)

११) सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग (सर्व)

१२) लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा व निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

१३) सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई मंत्रालय, मुंबई.

१४) निवडनस्ती (शिक्षण-२)

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment