उमेदवारांसाठी सूचना “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहण्याबाबत shikshak abhiyogyata buddhimatta test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उमेदवारांसाठी सूचना “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहण्याबाबत shikshak abhiyogyata buddhimatta test 

१. मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी मुलाखतीसह फेरीतील १०,३२८ रिक्त जागांवर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी ११,४९३ उमेदवारांची २७, १५४ प्राधान्यक्रमावर शिफारस झालेल्या उमेदवारांची नियमित फेरी (Regular Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक ३१/१०/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२. सदर निवडप्रक्रियेतील मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही दिनांक ३/११/२०२६ ते २५/११/२०२६ या कालावधीमध्ये घेण्याबाबतचे नियोजन उमेदवार प्राप्त झालेल्या शैक्षणिक व्यवस्थापनांना दिनांक ३१/१०/२०२६ रोजीच कळविण्यात आलेले आहे. याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांचेस्तरावरून कार्यवाही सुरु झाली आहे.

३. तथापि, काही समाज माध्यमामध्ये उमेदवारांना दिशाभूल करणारे बातम्या/वृत्त प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहण्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच काही उमेदवार राज्यस्तरावर येऊन मुलाखतीस उपस्थित/अनुपस्थित राहण्याबाबत विचारणा करत आहेत.

४. राज्यातील मुलाखतीसह या निवड प्रकारासाठी एकूण १,३१,५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. त्यातून ११,४९३ उमेदवारांची २७,१५४ प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यपान कौशल्यासाठी शिफारस झालेली आहे. त्यासाठी उमेदवारांनी एकूण प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रमापैकी त्यांच्या सोईचे निवडक ५० प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. उमेदवारांनी निवडलेल्या प्राधान्यक्रमापैकीच प्राधान्यक्रमावर गुणवत्तेनुसार निवड झाली आहे. यामध्ये उमेदवाराच्या अंतिम निवडीबाबत अधिकाधिक शक्यता आहे.

५. सध्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी व्यवस्थापनांना १:३ या प्रमाणात उमेदवार (उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे शिफारस केलेले सर्व ३ ही उमेदवार गैरहजर राहिल्यास पद रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.

६. सबब सध्या शाळांतील रिक्त असलेली पदे व निवडीसाठी झालेली शिफारस विचारात घेता उमेदवारांनी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.

७. याबाबत स्पष्ट करण्यात येते की, ज्या उमेदवारांची ३ प्राधान्यक्रमांवर निवडीसाठी शिफारस झाली असेल त्यांनी किमान २ ठिकाणी व ज्यांची २ प्राधान्यक्रमांवर निवडीसाठी शिफारस झाली असेल त्यांनी किमान १ ठिकाणी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. तसेच ज्यांची एका प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली असेल त्यांनी निवड झालेल्या प्राधान्यक्रमावर मुलाखतीस उपस्थित राहणे बंधनकारक राहील.

Related posts:

Leave a Comment