इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ eleventh online pravesh 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ eleventh online pravesh 

संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी (विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जामध्ये भरलेल्या माहिती नुसार व हरकतीनुसार सुधारीत) पोर्टलवर व विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी कोटातंर्गत (अल्पसंख्यांक, इन-हाऊस, व्यवस्थापन) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. अशा विद्यार्थ्यांची यादी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये दिनांक १२ जून २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालये आपणाला प्राप्त झालेल्या यादीनुसार कोटा निहाय गुणवत्ता यादी विद्यालय स्तरावर प्रसिध्द करतील व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संपर्क करतील.

विद्यार्थ्यांना कोटातंर्गत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक १२ जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून दिनांक १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वा. पर्यंत कालावधी मिळणार आहे. त्यानुसार दिलेल्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

कोटातंर्गत प्रवेश निश्चित करणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल कोटातंर्गत आपला प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची नावे (त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे) पुढील प्रवेश फे-यांमधून वगळण्यात येतील.

Related posts:

Leave a Comment