15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव bhartiy swtantryacha amrut mahotsav independence day celebration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव bhartiy swtantryacha amrut mahotsav independence day celebration 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सुंदर भाषण खालील प्रमाणे आहे

भाषणाची सुरुवात कशी करावी ते आपण या ठिकाणी पाहूया

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या प्रिय देशभक्तांना आज आपण आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत यानिमित्त मी तुम्हाला काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी नम्रतेची विनंती करते

आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला. भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक वीरांनी आपले बलिदान वाहिले आपल्या भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा गांधी नेताजी सुभाष चंद्र बोस लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी आपले बलिदान अर्पण केले अशा या महान विरांना माझे विनम्र अभिवादन.

आपला भारत देश दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता इंग्रजांनी भारतीयांवर अनन्य अत्याचार केले अनेक जणांना फासा वरती लटकवले तसेच आपल्या भारत देशातील गोरगरिबावर अन्याय केला त्यामुळे येथील जनता पेटून उठली अनेक जणांनी आपले बलिदान आपल्या देशासाठी समर्पित केले अनेक वीरांनी आपल्या घरादाराचा त्याग केला आणि भारत देशाला भारत मातेला इंग्रजांच्या साकळ दंडातून कायमचे मुक्त केले तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय.

आज देखील आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार अन्याय अत्याचार वाढत आहे या भ्रष्टाचारातून आपला देश मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने ही लढाई लढली पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे तर आणि तरच भ्रष्टाचार मुक्त भारत होईल.

आपल्या भारत देशामध्ये अनेक संकटे आहेत प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत दहशतवाद हा आपल्या देशाला लागलेला शाप आहे हा दहशतवाद समोर नष्ट करायचा असेल तर सर्वांनी आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

आपल्या देशामध्ये आजही भूकबळी जात आहेत यासाठी कार्य करणे गरजेचे आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहेत तरी देखील आपल्या देशामध्ये भूकबळीसारखे प्रकार घडत आहेत.

आपल्या देशासमोर सर्वात मोठे संकट म्हणजे अंधश्रद्धा होय आजही अंधश्रद्धेच्या पोटी अनेक जीव जात आहेत ही अंधश्रद्धा समोर नष्ट करण्याची सर्वांनी शपथ घ्यायला हवी तर आणि तरच भारत महासत्ता होऊ शकेल.

Leave a Comment