इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ eleventha class online pravesh prakriya
शैक्षणिक सत्र २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंत १० फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत.
मा. अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य व मा. मंत्री, महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक ३०/०९/२०२५ रोजीला झालेल्या बैठकीतील निर्देश आणि राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करुन विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने सदर ११ व्या अंतिम विशेष फेरीचे वैशिष्ठ्ये, जाहिर प्रकटन, वेळापत्रक सोबत जोडून देण्यात येत आहे.
विद्यार्थी / पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.

अंतिम व शेवटची विशेष फेरी घेणेबाबत.
सर्वसाधारण वैशिष्ठ्ये
१) दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. पासून ते ०६ ऑक्टोबर २०२५ दुपारी ०३.०० वा. पर्यंत विद्यार्थी नविन नोंदणी, प्राधान्यक्रम भरणे, प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे.
२) या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे.
३) ज्या विद्याथ्यर्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले आहेत त्यांच्या प्राधान्यक्रम / विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनश्चः रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेवून विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणनुक्रमे देण्यात येईल.
४) ज्या विद्यार्थ्यांनी विकल्प नोंदविला नाही त्यांना त्यास्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाची अलॉटमेंट करण्यात येणार नाही. तद्नंतरही गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुनःश्च विकल्प नोंदविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणनुक्रमे देण्यात येईल.
५) अशा उपरोक्त ०३ व ०४ मधील पध्दतीने कनिष्ठ महाविद्यालय अलॉट न होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्ये क अलॉटमेंट नंतर विकल्प बदलण्याची सुविधा शेवटच्या विद्यार्थ्यांस महाविद्यालय अलॉटमेंट होईपर्यंत देण्यात येणार आहे.
६) ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंटच्या टण्यावर महाविद्यालयाची अलॉटमेंट झाल्यास त्यांना पुनःश्च विकल्प भरता येणार नाही
७) तसेच विकल्प बदलावयाची वेळी एसएमएस / संकेतस्थळावर देण्यात येईल
८) प्रत्येक स्तरावर विकल्प न बदलल्यास आपणांस प्रवेश घ्यावयाचा नाही असे समजून आपणांस प्रवेश प्रक्रियेतील त्या टप्प्यावर विद्यार्थ्यांचा विचार प्रवेशाकरीता केला जाणार नाही.
९) उपरोक्त मुद्दा क्रमांक ०३, ०४ व ०५ मधील टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी गुणानुक्रमे विद्याथ्यांची अलॉटमेंट करण्यात येणार आहे.
१०) तनंतर प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याचे वेळापत्रक दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ नंतर देण्यात येईल. त्या दरम्यान प्रवेश करणे आवश्यक असेल.











