स्वच्छोत्सव विशेष मोहिम २०२५ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगकाम (White Washing / Painting work) करुन घेणेबाबत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वच्छोत्सव विशेष मोहिम २०२५ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगकाम (White Washing / Painting work) करुन घेणेबाबत

संदर्भ :- केंद्र शासनाचे दि.२९/०९/२०२५ रोजीचे प्राप्त ईमेल पत्र.

उपरोक्त विषयी केंद्र शासनाचे दि. २४/०९/२०२५ रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वच्छोत्सव विशेष मोहीम ५.० चा भाग म्हणून राज्यातील शाळांना दि.३१/१०/२०२५ पर्यंत दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण करणेबाबत सूचना दिल्या असून या विषयी संदर्भीय पत्रान्वये कळवीले आहे.

या संदर्भात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या शाळांना आवश्यकतेनुसार दुरुस्ती, व्हाईट वॉश, रंगकाम, तसेच शाळा परिसर सुशोभीकरण दि.३१/१०/२०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात यावे. याकरिता लागणारा निधी शासनाच्या इतर योजनेतून, CSR निधीतून, जिल्हा वार्षिक योजनेतून, संयुक्त शाळा अनुदान मधून उपलब्ध करुन कामे दि.३१/१०/२०२५ पर्यंत करुन घेण्यात यावीत, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment