समूह साधन केंद्र शाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळा याप्रकारच्या शाळांना इयत्ता ५ वी / इ.८ वी/ उच्च प्राथमिक/माध्यमिकचे वर्ग जोडणेबाबतच्या पट संख्येच्या अटीच्या संदर्भात स्पष्टीकरण samuha sadhan kendra shala

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समूह साधन केंद्र शाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळा याप्रकारच्या शाळांना इयत्ता ५ वी / इ.८ वी/ उच्च प्राथमिक/माध्यमिकचे वर्ग जोडणेबाबतच्या पट संख्येच्या अटीच्या संदर्भात स्पष्टीकरण samuha sadhan kendra shala

संदर्भ : १. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय प्राशाव-२०२३/प्र.क्र.९७/एस.एम-५/दि.१५/३/२०२४

शासन निर्णय pdf download

२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिस/टे-३०१/२०२५/३२६७/दि.२६/६/२०२५

३. राज्यस्तरीय शिक्षण परिषद मधील चर्चा

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि.१५/३/२०२४ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना इयत्ता ५ वी / इ.८ वी/ उच्च प्राथमिक/माध्यमिकचे वर्ग जोडणेबाबतची कार्यपध्दती विशद करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र.५ मध्ये पुढीलप्रमाणे नमूद केले आहे –

केंद्रशाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळा तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३० व उच्च प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३५ व त्यापेक्षा जास्त विदयार्थी असल्यास यांना प्राधान्याने इ.१ ली ते ४ थी च्या शाळांना इयत्ता ५ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता १ ली ते इ.७ वी च्या शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग व आवश्यक असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यात यावेत.

याबाबत पटसंख्येच्या अटी संदर्भात पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे –

समूह साधन केंद्र शाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळांमध्ये इयत्ता ५ वी / इ.८ वी / उच्च प्राथमिक/माध्यमिकचे वर्गजोडणी करिता पटसंख्येची अट लागू नाही. याव्यतिरिक्त इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वर्ग जोडण्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३० व उच्च प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात ३५ व त्यापेक्षा जास्त पटसंख्येची अट संदर्भीय शासन निर्णय, दिनांक १५.०३.२०२४ प्रमाणे असणार आहे.

तरी वरील सर्व बार्बीचा विचार करून आपल्या कार्यक्षेत्रात येणा-या समूह साधन केंद्र शाळा, आदर्श शाळा व पीएमश्री शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांबाबत इ.१ ली ते ४ थी च्या शाळांना इयत्ता ५ वी चा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता १ ली ते इ.७ वी च्या शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग व आवश्यक असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment