विद्युतदीपाचा महत्त्वपूर्ण शोध लावणारे महान वैज्ञानिक ‘थॉमस अल्वा एडिसन’ scientist thomas alwa adisan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्युतदीपाचा महत्त्वपूर्ण शोध लावणारे महान वैज्ञानिक ‘थॉमस अल्वा एडिसन’ scientist thomas alwa adisan 

(११ फेब्रुवारी, १८४७-१८ ऑक्टोबर, १९३१)

विदद्युतदीप आणि ग्रामोफोन

इसवी सन १८७९ पूर्वी या जगात विद्युतदीपसुद्धा उपलब्ध नव्हता. विद्युतदीपाचा महत्त्वपूर्ण शोध लावणाऱ्या महान वैज्ञानिकाचे नाव ‘थॉमस अल्वा एडिसन’ एडिसन वर्गात शिक्षकाला नेहमी प्रश्न विचारायचा. एकदा एडिसनने प्रश्न विचारला पण; शिक्षकाने त्या प्रश्नाकडे मुळीच लक्ष दिले नाही, उत्तरासाठी एडिसन हटून बसला. शिक्षकाने मग त्याचे शाळेतून नावच काढले आणि शेरा मारला की, हा मुलगा कमी डोक्याचा आहे. एडिसनची आई शिक्षिका होती. तिने मग त्याला थोडे फार घरच्या घरी शिकवले. शाळा नाही, मग एडिसनचे काही उद्योग चालायचे. घरीच त्याने एक लहानशी प्रयोगशाळा सुरू केली. वृत्तपत्र विकणे सोबत रेल्वेत गोळा विकणे, शालेय शिक्षण सुरळीतपणे न झालेला मुलगा आयुष्यात पुढे विश्वविख्यात शास्त्रज्ञ झाला.

दक्षिण अमेरिका विरुद्ध उत्तर अमेरिका ही लढाई तेव्हा सुरू झाली. युद्धाच्या बातम्यांची वृत्तपत्रांची मागणी वाढली. मग एडिसनच्या मनात विचार आला. आपण स्वतःच वृत्तपत्र काढून विकलं तर! मग त्याने एक छोटेखानी छापखाना विकत घेतला आणि तो रेल्वेतच लावून दिला. रेल्वेतच पेपर छापायचा अन् तो रेल्वेतच विकायचा. छापखान्यासोबतच धावत्या रेल्वेतच त्याने आपली प्रयोगशाळा सुरू केली. मात्र हे थोडे दिवस सुरू राहिले. एक दिवस त्याच्या प्रयोगशाळेत अचानक आग लागली. रेल्वे अधिकाऱ्याने त्याची प्रयोगशाळा रस्त्यावर फेकून दिली; पण एडिसन अडचर्णीना घाबणारा नव्हता.

एकदा स्टेशन मास्तरच्या मुलाचा जोरदार अपघात झाला. यावेळी एडिसनने त्याला वाचविले. स्टेशन मास्तर एडिसनवर खूप खूश झाला. त्याने एडिसनला तार पाठवण्याचे सगळे काम शिकवले. एडिसनने तारयंत्र पूर्वीच तयार केले होते. हे ज्ञान त्याला आणखी उपयोगी पडले. तो न्यूयॉर्क येथे काम शोधण्यासाठी गेला. त्याला लवकरच न्यूयॉर्क स्टॉक एक्सरचेंज टेलिफोन ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. तेव्हापासून एडिसनचे दिवस पालटले. त्याने पुन्हा आपला अदद्ययावत प्रयोगशाळा स्थापन केली. वेगवेगळे प्रयोग तो करू लागला, ‘नेवार्क’ येथील कारखान्यात मिस मेरी स्टिलवेल नावाची एक मुलगी तारखात्यात काम करत असे. अत्यंत चोख आणि व्यवस्थित काम करणारी अशी ती स्त्री-कामगार होती. तिला एडिसनविषयी नितांत आदर आणि

कुतूहल वाटत असे. अतिशय शांत व नम्र स्वभावाची मेरी एडिसनला आवडली. १८७१ च्या नाताळात थॉमस एडिसन व मेरी स्टिलवेल यांचा विवाह झाला. एडिसनच्या यशामागे त्याची आई नानसी हिचे मोठे योगदान होते.

वैज्ञानिक म्हणजे अनेक शोधांचा जन्मदाता! त्यांच्या विज्ञान शोधाची यादी बघितली तर भले भले लोक थक्क होतात. विजेचा दिवा, बोलती बाहुली, विद्युतघट, ग्रामोफोन, पहिला सिनेमा कॅमेरा, टाईपरायटर यंत्र इत्यादी शोध एडिसनने लावले. एके दिवशी एडिसनने नकाशा तयार केला व फोरमन जॉन कुशी याला नकाशा बरहुकूम यंत्र तयार करण्यास सांगितले. जॉन कुशी हा एडिसनच्या कारखान्यात यंत्रे तयार करणारा एक हुशार व कुशल कामगार होता. कुशी तन्मयतेने काम करी, तो एडिसनकडे गेला आणि विचारले, ‘हे विचित्र यंत्र कशासाठी बनवून घेणार?’

यंत्राला मी बोलायला लावणार आहे. एडिसनने गंभीरपणे उत्तर दिले.

यंत्राला बोलायला लावणार? अं मला वाटते की मला माहिती आहे की, ही कल्पना कुणालाही प्रथम हास्यास्पद वाटेल; तरीही शक्य तितक्या लवकर हे यंत्र मला तयार करून पाहिजे. येस, सर।

हे पाहा, हे यंत्र तयार करण्यासाठी तुला अठरा डॉलर मिळतील. शेवटी यंत्र तयार झाले.

एडिसन आपले आवडते गाणे, ‘Mary had a little lamb’ मोठ्याने म्हणू लागला. अशा प्रकारे बोलके यंत्र तयार झाले. सतत न कंटाळता विज्ञान प्रयोग करीत राहणे, हे एडिसनचे वैशिष्ट्य होते. प्रयोगाल मग्न असताना एडिसन तहानभूक सुद्धा विसरायचा.

विदयुतदीपाचा क्रांतिकारी शोथ –

विद्युतप्रवाहाच्या सहाय्याने तप्त केलेली धातूची तार निर्वात प्रदेशात जास्त वेळ प्रखरपणे जळून प्रकाश देते. ही गोष्ट लक्षात येताच एडिसनने जवळपास दोन हजारांहून जास्त प्रकारच्या वेगवेगळ्या तारा विद्युतदीपांत वापरून बघितल्या, सरते शेवटी एडिसनला बांबूच्या कार्बनिकृत धाग्यांत हवी असलेली तार सापडली. हल्ली विद्युतदीपांत ‘टंगस्टन’ धातूची तार वापरतात. भूमिगत तारांचे जाळे निर्माण करून एडिसनने मेन्लोपार्क चा संपूर्ण परिसर प्रकाशाच्या रोशणाईने प्रकाशमान करून टाकला. ती रात्र होती २१ आक्टोबर, १८७९ ची आणि हजारो प्रेक्षकांनी याप्रसंगी उपस्थिती दाखवून इतिहासात साक्ष प्रदान केली. या नयनरम्य प्रकाशमान प्रसंगी ‘बोझार्ड ऑफ मेन्लो पार्क’ची संकल्पना मिळाली. अशा प्रकारे या जगात

प्रथमच विद्युतदीपाद्वारे ‘प्रकाश युगाची’ सुरुवात झाली.

एकदा एडिसन तारा यंत्रावर काम करत असताना तारा यंत्रातील सुई त्यांच्या बोटाला जशी लागली तसे त्यांच्या तोंडातून काही शब्द निघाले. तो विचार करू लागला की, तारा यंत्रातून मानवी आवाजाचे स्पंदन कसे काय होऊ शकले? त्यानंतर त्याने एक हँडल असणारा धातूचा दंडगोल, एक सुई आणि कानाला लावायचा एक ट्रम्पेट बाजारातून प्रयोगशाळेत आणला. आता तारायंत्र ध्वनीचे रेकॉर्डिंग आणि पुनःप्रसारण करू लागले असता त्यांने दंडगोलाभोवती एक टिनच्या पत्राची शीट गुंडाळली आणि कानाच्या ट्रम्पेटवर गाणे म्हणू लागले. जेव्हा एडिसनने सुई तारा यंत्रावर ठेवून हँडल फिरवायला सुरुवात केली, तेव्हा त्याचेच गाणे जसेच्या तसे त्याला ऐकता आले. मग त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एडिसनने ‘ग्रामोफोनचा’ शोध लावून इतिहास घडविला होता. एडिसन नेहमीच म्हणत माझा एकही शोध अनवधानाने किंवा अपघाताने लागला नसून, विज्ञान संशोधनाचे समर्पित रूपाने कार्य केल्यामुळे त्याचा वेध मला घेता आला. ११ फेब्रुवारी, १८४७रोजी जन्मलेला एडिसन १८ ऑक्टोबर, १९३१ रोजी अमेरिकेतच मृत्यू पावला.

‘केवळ एक टक्का ज्ञान अन् नव्याण्णव टक्के परिश्रम, हे माझ्या यशाचे गमक आहे.’ असे तो विनम्रपणे सांगत असे. सतत कार्य करत राहायचे हे जणू थॉमस अल्वा एडिसनचे  व्रत होते.

Related posts:

Leave a Comment