गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे महान शास्त्रज्ञ “सर आयझॅक न्यूटन आणि गुरुत्वाकर्षण” scientist sir izac newton
(२५ डिसेंबर, १६४२ २० मार्च, १७२७)
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ.
आयझेंक लहान असतानाची ही गोष्ट. एक दिवस जोरदार वादळ झाले. वादळामुळे घराचे दरवाजे, शेताचे कुंपण, कुंपणाच्या फाटकाचीही पडझड तर झाली नाही ना हे पाहण्यासाठी आयझंकच्या आईने त्याला पाठविले. तर तो शेताच्या कुंपणावरून इकडेतिकडे उड्या मारत होता. का तर म्हणे वाऱ्याच्या वेगामुळे आपल्या उडीवर काही परिणाम होतो का, हे पाहण्यासाठी! लहानपणापासून त्याची संशोधकवृत्ती असावी.
उन्हाळ्यात रात्री अंगणात झोपायला किती मजा वाटते नाही! हं गच्चीवर देखील रात्री झोपणारे बरेच जण असतात. रात्री कधी कधी अंथरुणावर पडल्या पडल्या आभाळाकडे सहज लक्ष जाते. तेवढ्यात एखादा तारा निखळतो, सर्रकन खाली जमिनीकडे खूप जोरात झेपावतो. हे असे तारा निखळून खाली पडताना पाहणे, कुणी कुणी अशुभ मानतात. पण तसे काहीही नसते बरे का? झाडाला लागलेले आंबेदेखील पिकले की, जमिनीवर पडतात. ते असे सरळ जमिनीवर का पडतात? ते कधी वर का जात नाहीत आभाळात? नाही तर कुठे वाकडेतिकडे जाऊन का नाही पडत? सरळ जमिनीकडे का बरे झेपावतात? हाच प्रश्न आयझेंक न्यूटनला देखील पडला होता.
आयझेंक न्यूटनचा जन्म पूर्व इंग्लंडमधील लिंकशायर जवळील ‘बूल्सथार्प’ गावी २५ डिसेंबर, १६४२ रोजी झाला. त्याच्या पित्याचे नावसुध्दा आयॉक हेच होते. ते शेती करत. न्यूटनच्या जन्माच्या काही महिन्यांतच त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांची आठवण म्हणून मुलाचे नावही ‘आयझेंक न्यूटन’ ठेवण्यात आले. न्यूटनची आई हन्ना आयस्कॉप हिने काही दिवसांतच दुसरे लग्न केल्यामुळे न्यूटनचा बालपणी सांभाळ त्याच्या आजीने केला. घरच्या लोकांची इच्छा होती की, न्यूटनने शेती करावी; पण न्यूटनला पुस्तक वाचण्यातच जास्त रुची होती. न्यूटनच्या मामाने त्याला कॅम्ब्रीज विद्यापीठात शिकण्यासाठी प्रेरित केले. इसवी सन १६६१ मध्ये न्यूटनने ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे न्यूटनने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण १६६५ पर्यंत पूर्ण केले. त्या वेळी कुणीच असा विचार मनातसुद्धा आणला नाही, की ‘भविष्यात न्यूटन-कोपर्निकस, गॅलिलिओ किंवा केप्लरसारखा महान वैज्ञानिक होईल. इसवी सन १६६५ साली लंडनमध्ये प्लेगची साथ सुरू झाली. त्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. कॅम्ब्रीज विद्यापीठात विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. या सुट्टीत न्यूटन लिंकनशायरमधील शेतीवर राहू लागला. या सुट्टीत न्यूटनने कॅलकुलस, डिफरशिअल आणि इंटिग्रल कॅलकुलस, नवीन गणिती पद्धतीची आधारशिला तयार केली. एकदा मनोर बागेत
सफरचंदाच्या झाडाखाली तो बसला असता, एक सफरचंद अचानक न्यूटनच्या डोक्यावर पडले आणि त्यातून त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे आपले गुरुत्वाकर्षण असते आणि पृथ्वीवरून वर फेकली गेलेली प्रत्येक वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली पडते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात, त्या अंतराळात फेकल्या जात नाहीत. याला काही तरी कारण असले पाहिजे अशी त्याची खात्री होती. या प्रश्नाची एकाग्रचित्ताने उकल करताना त्याने सफरचंद जमिनीवर पडताना पाहिले. गुरुत्वाकर्षण किती अंतरापर्यंत पोचू शकते असा प्रश्न त्याला पडला. चंद्रापर्यंत जर ते पोचत असेल, तर त्यामुळेच चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहून दूर जात नसावा, असे त्याला वाटले. त्याने केप्लरचे नियम वापरून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने ग्रहांच्या कक्षेचे कोडे सोडवलं. वस्तूचे वजन व त्यांच्यातील अंतराच्या प्रमाणात गुरुत्वाकर्षणाची ताकद असते. असं त्याने दाखवून दिले. धूमकेतूच्या कक्षादेखील गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतात असे त्याने गणिताच्या साहाय्याने दाखवून दिले. भिंगाच्या दुर्बिणीतून मिळणारी प्रतिमा रंगीत असते. हा दोष घालवण्यासाठी न्यूटनने आरशाची दुर्बीण तयार केली. लंडनच्या रॉयल सोसायटीत या दुर्बिणीची प्रशंसा झाल्याने १६७८ मध्ये त्याला ‘रॉयल सोसायटी’चे सभासदत्व बहाल करण्यात येऊन त्याचे शोध जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले.
पांढऱ्या रंगात सातही रंग असतात, हे देखील न्यूटननेच प्रथम सिद्ध करून दाखवले. त्यासाठी त्याने एक चक्र तयार केले. त्यावर त्याने सातही रंग समानतेने रंगवले. मग ते चक्र त्याने जोराने फिरवले, वेगाने फिरणाऱ्या त्या चक्रावरील सातही रंग एकरूप झाले. त्याच्या ठिकाणी फक्त पांढरा रंग दिसू लागला. सूर्याचा प्रकाशही पांढराशुभ्र असतो, मात्र त्यात तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा अन् जांभळा… हे रंग असतात न्यूटने हे दाखवून दिले.
१) रॉकेट वायुमंडलातील हवेला आधार बनवून आपले मार्गक्रमण करते. यात न्यूटनचा तिसरा नियम कार्य करतो. प्रिंसिपियाच्या शेवटच्या भागात चंद्र व धूमकेतूचा वेग, पृथ्वीचा आकार इत्यादी विषयांची उपयुक्त माहिती दिली आहे. न्यूटनने सिद्ध केले की, त्याचे गतिविषयक नियम पृथ्वीवरील वस्तू सोबतच खगोल पिंडावरसुद्धा लागू पडतात. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे ब्रह्मांडातील प्रत्येक दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करतात.
२) आयुष्याच्या उत्तरार्धातसुद्धा न्यूटनचे विज्ञान संशोधन सुरूच होते. या व्यतिरिक्त त्याने आपला वेळ आध्यात्मिक चिंतन, ज्योतिष आणि रासायनिक संशोधनात व्यतीत केला. इ.स.१७०५ मध्ये राणीने न्यूटनला ‘सर’ ही पदवी बहाल केली. न्यूटन आजन्म अविवाहित होता. न्यूटनच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय परिमाण पद्धतीत बल (force) मोजण्याचे एकक ‘न्यूटन’ ठरविण्यात आले. न्यूटनने त्याचे बरेच शोध प्रसिध्द न करता आपल्यापाशीच ठेवले. काही शोधांच्या प्रसिद्धीनंतर लोकांनी केलेली टीका किंवा अमूक एक शोध हा पूर्वीच प्रसिद्ध केला गेला आहे, हे त्याला सांगताच तो रागावत
असे. त्याचा मित्र एडमंड हॅलेच्या आग्रहास्तव न्यूटनने ग्रहगोलांच्या गतिविषयाचे त्याचे संशोधन लिहिले. हॅलेने हे अनमोल संशोधन स्वतःच्या पुस्तकरूपात प्रकाशित केले. अशा रीतीने न्यूटनच्या ‘प्रिंसिपिया’ नावाच्या जगप्रसिद्ध पुस्तकाद्वारे जगाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतीचे तीन नियम कळले. वीस वर्षांपूर्वीचे न्यूटनचे संशोधन हॅलेमुळे प्रसिद्ध झाले. न्यूटनला जगप्रसिद्धी मिळाली. हॅलेच्या पाठपुराव्यामुळे प्रिंसिपियाचा पुढचा खंड पूर्ण झाला व न्यूटनच्या डोक्यातले विज्ञान जगापुढे आले.
३) आपल्या उर्वरित आयुष्यात काही काळ न्यूटन यांनी टांकसाळीत काम केले. तिथल्या कामामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळाला, राजाश्रय मिळाला. ‘नाईटहूड’चा किताब मिळाला. राजकारणात देखील त्यांने या काळात रस घेतला ‘रॉयल सोसायटी’त पंचवीस वर्षे काम करून शेवटी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी २० मार्च, १७२७ रोजी न्यूटन हे महान शास्त्रज्ञ मृत्यूला सामोरे गेले. आइनस्टाइनच्या मते, ‘हे विश्व न्यूटन यांच्या उघड्या पुस्तकासारखक होते; मात्र न्यूटन स्वतःविषयी म्हणायचे, “जग माझ्याविषयी काय म्हणते ते मला ठाऊक नाही; मात्र मी स्वतःला समुद्रकिनाऱ्यावर खेळणारा लहान मुलगा समजतो. अमर्याद विश्वाची कोंडी समोर असताना मी वेगळ्या प्रकारचे शंखशिंपले व गोट्या गोळा करण्याचा हा प्रयत्न केला, न्यूटन यांच्यासारखा महान वैज्ञानिक सतराव्या शतकावर आपल्या कार्याची छाप पाडून अजरामर झाले.









