जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व पदार्थ वैज्ञानिक “डॉ.होमी जहांगीर भाभा” scientist homi jahangir bhabha
(३० ऑक्टोबर, १९०९- २४ जानेवारी १९६६)
गुरुत्वाकर्षण संबंधी सिद्धांत
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व पदार्थ वैज्ञानिक
एका संपन्न आणि सुसंस्कृत कुटुंबात भाभा यांचा जन्म झाला. मुंबईतील त्या वेळचे प्रसिद्ध दानशूर सर दिनशा पेटीट यांची नात मेहरबाई ही होर्मीची आई. तर बॅरिस्टर जहांगीर होरमसजी हे त्यांचे वडील. परदेशात शिक्षण घेतलेले होरमसजी, टाटा उद्योग समूहाचे कायदेशीर सल्लागार होते. त्याशिवाय ते टाटांच्या अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापकीय समित्यांवर काम करत होते. होमीला आपल्या वडिलांची चित्रकला, संगीत, यांतील, जाण आणि व्यासंग, त्याच बरोबर त्यांच्या बागबगीच्याचा छंद या सर्वोत्तम गुणांचा वारसा मिळाला होता. टाटांच्या पुढाकाराने बंगळुरू येथे स्थापन झालेल्या विज्ञान संस्थेवर होर्मीचे वडील जहांगीर आणि आजोबा होरमसजी ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. त्यामुळे रामन यांच्याशी दोघांचाही परिचय होता. ‘भाभा कुटुंब केवळ व्यवसायाने टाटा समूहाशी बांधले गेले असे नव्हते, तर विवाहसंबंधानेही ते जोडले गेले होते. भारताचे औदयोगिक पितामह जमशेटजी टाटा यांची सून म्हणजे होमी यांची सख्खी आत्या होती. सर दोराब टाटा आणि त्यांची पत्नी मेहरबानी यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी होमीला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागणूक दिली. टाटा कुटुंबाच्या
सान्निध्यामुळे सुसंस्कृतपणा, उद्योगधंदा, समाजकार्य आणि संस्थांची उभारणी यांचा वारसा होमीला मिळाला
होता. होमीने तो खराही करून दाखवला. दुधात साखर घातली म्हणजे दुधाची मूळची गोडी वाढते. त्याप्रमाणे
होमीची प्रज्ञावान बुद्धी आणि सुस्थितीत असलेले कौटुंबिक वातावरण यांचा असाच सुंदर मिलाफ झाला होता.
आईवडिलांचे होमीवर बारीक लक्ष होते. हा मुलगा सर्वसामान्यांपेक्षा काही वेगळाच, बुद्धिमान आहे, याची त्यांना कल्पना होती. इतर मुलांच्या तुलनेत तो फारच कमी झोपत असे. आईवडिलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला व उपाय केले. प्रख्यात बालरोग तज्ज्ञाचे मत पडले की, त्याची प्रकृती अगदी योग्य आहे.
आधुनिक काळात अणुसंशोधनाची गरज ओळखून डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी भारतात अणुसंशोधन केंद्राचा पाया घातला. ‘शांततेसाठी अणू’ या संकल्पनेचा पुरस्कार करून त्यांनी त्या आधारे भारताचे अशा संशोधनासाठी त्यांनी अन्य शास्त्रज्ञांनाही उदयुक्त केले. अणुधोरण तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वैयक्तिकरीत्या संशोधन करण्याऐवजी देशहितार्थ
विसाव्या शतकाच्या अखेरीस अणुक्षेत्रात भारताला समर्थ करण्याचे मूलभूत श्रेय भाभांना जातं. होमी भाभांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. १९२६ साली ते केंब्रिज विद्यापीठात गेले. तिथे
व तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यात शिष्यवृत्ती मिळवली, इतकेच नव्हे तर केंब्रिज विदद्यापीठाने त्यांना ‘हॉपकिन्स पारितोषिक’ दिले. तर इसवी सन १९३४ चे ‘डॅम्स पारितोषिक’ हा सन्मान त्यांना मिळाला. त्यांच्यावर विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन व पॉल दिराक या दोघांचा मोठा प्रभाव होता. वास्तव शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या पॉल दिराक यांच्या हाताखाली त्यांनी काही काळ संशोधन केले. याच सुमारास ‘कॉस्मिक रेज’ विश्वकिरण या विषयावरील प्रा. आर्थर कॉम्टन यांच्या व्याख्यानामुळे प्रभावित होऊन भाभांनी आपल्या डॉक्टरेटनंतरच्या संशोधनासाठी ‘विश्वकिरण’ हाच विषय घेतला. हे संशोधन त्यांनी डॉ. हायटलर यांच्यासोबत केले. या संशोधनावरील त्यांचे अनेक शोधनिबंध सर्व दूर गाजले. याच सुमारास भाभांनी अणुविज्ञान संशोधनाचे महत्त्व पाश्चात्त्य देशांच्या धर्तीवर भविष्याकडे लक्ष ठेवून भारतातही मूलभूत संशोधन संस्था सुरू करायला हवी, असं मत टाटा उद्योग समूहाकडे व्यक्त केले. तेव्हा टाटांनी भारतात ही संस्था सुरू करण्याची जबाबदारी भाभांवर टाकली व १९४५ साली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च’ ही संशोधन संस्था उदयास आली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाभांना अणुसंशोधनाची उपयुक्तता पटवून दिली. १९४८ मध्ये भारत सरकारने तुर्भे येथे अणुसंशोधन केंद्राची स्थापना केली. शांततेसाठी अणुसंशोधन या योजनेचा पाया डॉ. भाभांनी घातला. अणुकिरणोत्सर्गी समस्थली यांच्या विविध क्षेत्रांतील उद्योगांसंबंधी संशोधन सुरू केले. अणूचा शांततेसाठी उपयोग करण्याच्या धोरणासंबंधी चर्चा करण्यासाठी १९५५ मध्ये संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ते अध्यक्ष होते. भाभांनी भारतात अणुविषयक कार्यक्रम रुजविला. १९५६ मध्ये ‘अप्सरा’ या अणुभट्टीची उभारणी झाली. ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो’ आणि ‘भारतीय इलेक्ट्रॉनिक आयोग’ सुरू होण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. डॉ. भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाला चित्रकार, संगीत, वृक्षप्रेमी असे अनेक पैलू होते.









