१५० दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत E-office ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत e-office shasan paripatrak
संदर्भ :
१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दि. ०२.०२.२०२३
२) माहिती व तंत्रज्ञान विभाग (साप्रवि), दि. २३.०२.२०२३
३) विभागाचे शासन परिपत्रक दि.०३.०८.२०२३, दि १०.०५.२०२४, दि.२१.०३.२०२५ व दि. २५.०८.२०२५.
४) शासन परिपत्रक क्र. ईगव्ह-२०२५/प्र.क्र.२३/संगणक, दि. ०७.०८.२०२५.
प्रस्तावना :-
मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागामध्ये दि.०१ एप्रिल, २०२३ पासून ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान संचालनालय (सामान्य प्रशासन विभाग), यांच्या संदर्भाधिन क्र. २ येथील शासन परिपत्रकान्वये ई-ऑफिस अंमलबजावणीकरीता मानक कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे. संदर्भाधीन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांस अनुसरून विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना ई-ऑफिस प्रणालीचा वापर करून नस्ती/घारिका ही ई-ऑफिस प्रणालीद्वारे सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. तसेच, संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन परिपत्रकान्वये विभागातील तसेच क्षेत्रीय स्तरावरील शासकीय कामकाज पूर्णपणे ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याबाबत सूचित केले आहे. तथापि, विभागामध्ये फिजीकल (ऑफलाईन) टपाल स्विकारण्यात येत असून त्या आधारे ई-नस्ती तयार करण्यात येत असल्याने ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे सुरू झालेला दिसून येत नाही. त्यामुळे, ई-ऑफिसचे मुळ हेतू साध्य होत नाही.
त्यानुषंगाने १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीवर प्राप्त झालेल्या ई-टपालावरच नस्ती सादर करणे अनिवार्य करण्याची देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
१५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व कार्यासनात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयातील (सर्व राज्यस्तरीय कार्यालये, विभागीय क्षेत्रिय कार्यालये तसेच जिल्हास्तरावरील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालये) शासकीय कामकाजात यापुढे ई-ट्पालावरच कार्यवाही करणे याद्वारे अनिवार्य करण्यात येत आहे.
२. विभागात प्राप्त होणारे टपालांवर तात्काळ कार्यवाही व्हावी च वेळेचा अपव्यय होऊ नये पाकरीता यापुढे क्षेत्रीय कार्यालयाकडून पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई-ऑफिस माध्यमातून पाठविण्याबाबतची कार्यवाही काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत.
4. क्षेत्रिय कार्यालयामार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. पुस्तके, वैद्यकिय परतावा देयके प्रस्ताव इ ई-ऑफिस माध्यमातून पाठविणे शक्य नाही केवळ असेच टपाल नोंदणी शाखेमार्फत स्वीकारण्यात यावे. याव्यतिरिक्त इतर कोणतेही रपाल फिजीकल (ऑफलाईन स्वरुपात स्विकारु नये
तसेच, यापुढे नोंदणी शाखेने मा. मंत्री शालेय शिक्षणा, मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण, प्रधान संचिय शालेय शिक्षण तसेच विभागातील सर्व उप सचिव यांच्या कार्यालयाकडून प्राप्त होणारे फिजीकल टयाल स्विकारुन त्याचे ई-टपाल। ई-रिसिप्ट बनवून कार्यासनांकडे पाचविण्यात बाचे.
विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी यामुळे कार्यासनात कोणतेही फिजीकल (ऑफलाईन) टपाल स्विकारू नये. गीदाणी शाखेमार्फत ई ऑफिस प्रणालीवर प्राप्त झालेल्या ई टपालावरस (ई रिसिप्ट) नवीन ई धारिका तयार करून सादर करण्यात यावी.
E यापुढे सर्व कार्यासनांनी आपल्या कार्यरानामधून निर्गमित होणारे सर्व प्रकारचे पत्रव्यवहार हे
डिजीटल स्वाक्षरी करूनच ई-ऑकीरा प्रणालीच्या गाध्यमातून इतर कार्यासन / क्षेत्रीय कार्यालयान्च निर्गमित करावेत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mahusahba.gov.in या संकेतस्थळावर उपलब्य करण्यात आला असून त्याचा संकेताळ २०२५१११९१६५३००५८२१ अता आहे. डा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल वाच्या आदेशानुसार व नावाने,









