पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ pavitra portal shikshak bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ pavitra portal shikshak bharti 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत.

“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ८० टक्के पदांसाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे.

पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३,३५२ मनपाच्या-१,९५४, नगर पालिका/परिषदाच्या २८० व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १२,१४८ अशा एकूण ३०,२०९ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणेः

व्यवस्थापननिहाय प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील :

पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.

उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेत स्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक ०६/०८/२०२६ रोजी दिली आहे.

उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक ०६/०८/२०२६ ते ११/०८/२०२६ पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे.

पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे/मागणी इ. बाबी edupavitra25@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment