“भ्रष्टाचार संपविणे काळाची गरज” मराठी भाषण marathi bhashan
आज दिनांक…../…../….. रोजी रविवार आजच्या या शारदा मातेच्या पुजनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री…. …… माझे सर्व वर्ग मित्र माझे सर्व गुरूजन, मॅडम व चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाची सुरूवात करणारे संचालक (कार्यवाहक) आणि मूर्तीच्या रूपात असलेली शारदा माता.
मी आज भ्रष्टाचार या विषयावर तुम्हाला भाषणाच्या माध्यमातून जे काही सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे हिच करतो. विद्यार्थी मित्रांनो भ्रष्टाचार म्हणजे काय? एखाद्या वेळेस कोणत्याही शाखेचा सरकारी कर्मचारी सरकारी पैशाचा किंवा खजिन्याचा स्वतःच लुटमार करतो किंवा गैरवापर करतो. त्याला भ्रष्टाचार असे
म्हणतात. आपल्या देशात अलीकडे भ्रष्टाचाराला
फार जोर आला आहे. अनेक ककर्मचारी मोठ-मोठ्या पदावर असतात तरी सुध्दा पैशाच्या मोहापायी सरकारी पैशाचा गैरवापर करतात. सरकारी खजिना लुटतात. अशा प्रकारच्या समस्या दिवसें दिवस झपाट्याने वाढतच चालल्या आहेत याला जबाबदार कोण?
मित्रांनो, भ्रष्ट व्यक्तीला किंवा भ्रष्ट नेत्याला कडक शिक्षा व्हायला किंवा सरकारनं म्हणले कोर्टानं फाशी जर दिली तर भ्रष्टाचार थांबू शकतो. अशा चुका व्यक्ती पुन्हा करणार नाही. एकेकाळी हर्षद मेहताने शेयर्स घोटाळा केला तर लालूप्रसाद यादव यांनी चारा घोटाळा करून सरकारच्या हातावर तुरी पेरल्या त्यांचे सरकार काहीच बिघडवू शकले नाही. असेच जर चालत जर चालत राहिले तर देशावा मान किनाऱ्यावर येवून पोहचेल. प्रत्येक भारतीय व्यक्ती किंवा सरकारी व्यक्तीने देशाकरिता प्रामाणिकपणे इमानदारीने काम केले पाहिजे. त्याला त्याच्या मेहनतीचा मोबदला आपली भारत सरकार देतेच. मग त्यानं या देशाशी बेईमानी, दगाबाजी का करावी ?
विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एका शिक्षकांना सांगितले होते की तुम्ही जर भविष्यात सरकारी नोकर झाले तर भ्रष्टाचार करायचा नाही. कारण भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला मोझ मिळत नाही. त्याला समाजात व अन्य कार्यात पुन्हा भाग घेता येत नाही असे सांगणारे सर आज या जगातून कायमचे निघून गेले. त्यांचे नाव श्री. विनायक काळपांडे होते. आज चपराशी पासून तर उच पदावर काम करणारे काही अधिकारी भ्रष्ट काम करतात. त्यांचे हे बोल मी कधीही विसरू
शकणार नाही.
विद्यार्थी मित्रांनो पण भविष्यात पुढारी नेते जर झाले तर गरीबांच्या कल्याणाकरिता घरे, शेती त्यांना उपलब्ध करा. सरकारी पेशाचा उपयोग देशाच्या कल्याणासाठी, विकासासाठी करा. भ्रष्टाचाराला आळा घाला. भ्रष्ट नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी चप्पल जोड्यांचा मारा द्या. जे काम सरकारी पोलीस करत नाही ते तुम्ही करा. कारण खरा लोकतत्र तुमच्याच हातात आहे तर लहान तोंडी मोठा घास अशी म्हण आहे पण मी जे काही सांगत आहे ते अगदी खरे आहे.एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो…..
जय जवान जय किसान जय विज्ञान……









